शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

लॉकडाऊन काळात शाळेचे पालटले रूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2020 1:07 AM

एक छोटं पाऊल मोठा बदल घडवतं असं म्हणतात. असंच छोटं पाऊल उचललं आहे एणगाव हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी !

ठळक मुद्देमाजी विद्यार्थ्यांचा पुढाकारलोकसहभागातून एणगाव हायस्कूल बनले हायटेक

बोदवड, जि.जळगाव : एक छोटं पाऊल मोठा बदल घडवतं असं म्हणतात. असंच छोटं पाऊल उचललं आहे एणगाव हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी ! लॉकडाऊन कालावधीत शाळा बंद परिस्थितीचा उपयोग करून शाळेचं रुपडं पालटून तिला हायटेकसुद्धा केली.बोदवड तालुक्यातील एणगाव येथे गोपाळ देवबा ढाके माध्यमिक विद्यालय आहे. या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून पुरुषोत्तम गड्डम यांनी १ मार्च २०२० रोजी पदभार स्वीकारला. सुरुवातीच्या काळात जुनी इमारत व गळक्या वर्गखोल्या दुरुस्तीचे काम त्यांनी स्वखर्चाने सुरू केले. वर्गखोल्या उत्तम रंगांचा वापर करून भिंती बोलक्या केल्या. संपूर्ण इमारत रंगवून त्यावर चित्रकारांच्या मदतीने निसर्ग चित्रे काढून घेतले. संपूर्ण परिसरासह प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेतले......आणि लोकसहभाग लाभलाशाळेच्या बाह्यरूपात सकारात्मक व लक्षणीय बदल झाल्याचे दिसून येताच गावकरी आणि माजी विद्यार्थ्यांनी आर्थिक मदत करण्याची तयारी दाखवली. संस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळ यांना विश्वासात घेऊन यासंदर्भात चर्चा करण्यात आली. संस्थेच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून मिळालेल्या देणगीतून मग शाळा हायटेक कशी करता येईल यावर लक्ष केंद्रित केले.ग्रामस्थांचे यश-मुख्याध्यापक गड्डमतंत्रज्ञान दिवसागणिक बदलत असते. त्यानुसार शाळेत संगणक प्रणाली हायटेक केली. लॉकडाऊनच्या काळात याच संगणकावर व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून आॅनलाईन क्लासेस सुरू केले. प्रत्येक वर्गात स्मार्ट टीव्हीद्वारे आनंददायी शिक्षण देण्याचे नियोजन केले आहे. ओपन बुक लायब्ररी सुरू केली आहे. विद्यार्थ्यांना बैठे खेळ खेळण्यासाठी इनडोअर प्ले-स्टेशन सुरू केले आहे. विज्ञान प्रयोगशाळा अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. या संपूर्ण बदलासाठी पैसे उभे करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी मदत केली. आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी तथा भारतातील होरायझन आॅटोमेशन कंपनीचे संस्थापक दीपक लक्ष्मणसिंग पाटील यांनी तथा त्यांच्या मित्रबांधवांनी मोलाची मदत केली आणि शाळा नव्या रुपात हायटेक झाली. त्यामुळे आता शाळेत विद्यार्थी संख्या वाढली आहे. सेमी इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझे सहकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी व सरपंच अन्नपूर्णा विनोद कोळी आणि गावकरी बांधवांचे भरीव सहकार्य लाभल्याने ही यशोगाथा सिद्धीस आली, अशी माहिती मुख्याध्यापक पुरुषोत्तम गड्डम यांनी दिली.

टॅग्स :SchoolशाळाBodwadबोदवड