फार मोठ्या शहरात (मेट्रो)मध्ये सामान्य जीवन मोठ्या प्रमाणात बाधित झालेले दिसून आले व कोरोनाचा परिणाम म्हणून `वर्क फ्रॉम होम` ही संकल्पना रूढ होऊन स्वीकारली गेली. याचा परिणाम म्हणून जळगाव सारख्या जळगाव शहरातून पुणे, मुंबई अशा मोठ्या शहरात कामा निमित्त स्थायित असलेली मंडळी आता आपल्या गावाकडे घर शोधू लागली. कोरोनामुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या, त्यामुळे ते मुळ गावात नोकरी व पर्यायाने राहण्यासाठी घरे शोधू लागली. नोकऱ्या गेल्यामुळे किंवा कोरोना काळात पगार न मिळाल्यामुळे अनेकांना घरे घेण्यासाठी अडचणी आल्या, यावर उपाय म्हणून सरकारने व्याज कर न्युनतम पातळीवर आणला. तसेच राज्य सरकारने स्टँम ड्युटी मध्ये अभूतपूर्व घसघशीत ३ टक्के सुट दिली, यामुळे घरे घेणाऱ्यांना खुप मोठा दिलासा व गृहबांधणी क्षेत्राला मोठी संजिवनी मिळाली.
कोरोनामुळे बांधकाम क्षेत्रातील परप्रांतीय कामगार मंडळी आपआपल्या गावी गेली, ती अजूनही १०० टक्के परत आलेली नाहीत. याचा परिणाम म्हणून स्थानिक कामगारांना नवीन कामाची दालन उपलब्ध झाली. बांधकाम क्षेत्रात जास्तीत जास्त मनुष्य बळ लागते, हे मनुष्यबळ संपुर्णपणे स्थानिक पातळीवर उपलब्ध नसते व अजूनही रेल्वे व बससेवा १०० टक्के पुर्ववत झालेली नसल्याने मनुष्यबळाचा तुटवडा जाणवतो , या कामांपैकी जी कामे यंत्राच्या सहाय्याने करण्यासाठी आहेत, ती कामे यंत्रसामुग्री घेऊन करुन घेण्याकडे कल वाढला आहे.
कोरोनानंतर परदेशातून येणारा कच्चामाल, सामानावर काही अंशी बंधने असल्यामुळे बऱ्याच बांधकाम साहित्याचे भाव वधारले. अशा वस्तूंची उपलब्धता कमी झाली. अशा वस्तुंचे स्वदेशी पर्याय शोधावे लागले. अशा विविध समस्यांमुळे गृहबांधणी व बांधकाम क्षेत्र सामोरे जात आहे. पण मला भारतीय माणसाच्या जिद्द, चिकाटी व जास्त रोजगार निर्मिती करणारे, सुमारे २५० कारखान्याचे उत्पादन वापरणारे हे अतिशय महत्वाचे क्षेत्र पुन्हा नव्या जोमाने आव्हानांना सामोरे जात, नवीन उभारी घेऊन राष्ट्र बांधणीसाठी एक अतिशय महत्वाचे योगदान देईल.
अनिश शहा
बांधकाम व्यवसायिक