राम जाधव,आॅनलाईन लोकमत दि़ २३, जळगाव : सध्या वातावरण बदलेले आहे, त्यामुळे अशा वातावरणात अळींचा प्रादुर्भाव वाढतो़ मात्र योग्य वेळी एक किंंवा दोन फवारण्या केल्यास या किडींवर नियंत्रण मिळविता येते़ तसेच औषधे वापरताना एकावेळी एकच किडनाशक वापरावे एकपेक्षा अधिक किडनाशक एकत्र करू नये़ त्यामुळे खर्चातही बचत होतेच, शिवाय औषधांचे चांगले परिणामही मिळतात़शेंगा पोखरणारी हिरवी अळी : या किडीची मादी पतंग सरासरी ६०० ते ८०० अंडी तुरीच्या कळ्या व कोवळ्या शेंगावर घालते. अंड्यातून निघालेली अळी कळ्या, फुले आणि कोवळ्या शेंगा कुरतडून खाते. वेळीच नियंत्रण न केल्यास पिकाचे ६० ते ८० टक्क्यांपर्यंत नुकसान होते. डिसेंबरमध्येही ढगाळ वातावरण कायम राहिल्यास या अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते़उपाय : तुरीच्या एक मीटर ओळीत शेंगा पोखरणाºया दोन अळ्या आढळून आल्यास इमामेक्टिन बेंझोएट (५ एस.जी.) ६ ग्रॅम किंवा इंडोक्झाकार्ब (१५.८ ईसी) १० मि.ली. किंवा फ्ल्यूबेंडियामाइड (३९.३५ एस.सी.) ४ मि.ली. किंवा क्लोरअँट्रानिलीप्रोल (१८.५ एस.सी.) ५ मि.ली. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रिन (५ ईसी) १० मि.ली. यापैकी कोणत्याही एका कीडनाशकाची १५ लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. लहान अवस्थेतील अळीवर घाटेअळीच्या विषाणूची (एचएनपीव्ही) एकरी २०० मि.ली.फवारणी केल्यास फायद्याचेच़तूर पिकावरील शेंगा पोखरणारी हिरवी अळी किंवा घाटे अळीच्या नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस २५ ईसी ४० मि.ली. किंवा क्लोररपायरीफॉस २० ईसी प्रती १५ लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.ब्लिस्टर बीटलसध्या दुसºया ते तिसºया बहाराच्या फुलोºयाची अवस्था तुरीमध्ये असून ब्लिस्टर बीटल या किडीचाही प्रादुर्भाव वाढतो आहे. प्रौढ भुंगेरे काळ्या रंगाचे असून, एक भुंगा एका दिवसामध्ये २० ते ३० फुलांचे नुकसान करतो. या किडीच्या अळ्या जमिनीत राहून नाकतोड्याच्या अंड्यावर उपजीविका करत असल्याने फायदेशीरही ठरतात.उपाय : यासाठी पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. अधिक प्रादुर्भाव असल्यास, सायपरमेथ्रीन (१० टक्के प्रवाही) १५ मि. ली. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) १५ मि. ली. प्रती १५ लीटर पाण्यात फवारणी करावी.
महाराष्ट्रातील वातावरण बदलामुळे तुरीवरील कीड व्यवस्थापन गरजेचे
By ram.jadhav | Published: November 23, 2017 7:24 PM
सध्या वातावरण बदलेले आहे, त्यामुळे अशा वातावरणात अळींचा प्रादुर्भाव वाढतो़
ठळक मुद्देढगाळ वातावरणात घ्यावी तुरीच्या पिकाची काळजी योग्य वेळी फवारणी केल्यास मिळविता येते नियंत्रणएकावेळी एकच औषध वापरावे़