अजय कोतकरगोंडगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : तब्बल दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर शाळा चालू झाल्या खऱ्या, परंतु या शैक्षणिक वर्षापासून बालभारतीने अभ्यासक्रम बदलास सुरुवात केली असून इयत्ता दुसरीच्या गणित पुस्तकातील गणित शिक्षणात आमुलाग्र बदल करण्यात आला आहे. संख्या वाचन करताना एकवीसऐवजी वीस एक, त्र्याहत्तर ऐवजी सत्तर तीन, त्र्याण्णव ऐवजी नव्वद तीन असे वाचण्याच्या सूचना अभ्यास मंडळाने दिल्या आहेत.मराठी जोडाक्षरे कठीण असल्याचे सांगत बालभारतीने नवीन पद्धती अवलंबली आहे. यावर्षी दुसरी व अकरावीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला. अकरावी अभ्यासक्रम सुरू होण्यास अद्याप एक-दीड महिना बाकी आहे; पण दुसरीच्या बदलाने मात्र शिक्षक वर्ग अचंबित झाला आहे. जोडाक्षरे नको म्हणून पाढे पठणाची व लिहिण्याची पद्धतच बदलली आहे. या शैक्षणिक वर्षापासून दुसरीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला. पहिल्याच दिवशी दुसरीच्या शिक्षकांना मोठा धक्का बसला आहे. या पुस्तकात नवी व जुनी पद्धत अशा दोन्ही स्वरुपात मांडणी देण्यात आली आहे. मात्र ही देत असताना शिक्षकांनी नवीन पद्धतीने शिकवावे, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. या सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ होणार आहेच. तसेच ही भाषेची गळचेपी असल्याची भावानाही शिक्षक वर्ग व्यक्त करत आहे.संख्या वाचनासाठी तीन पद्धती देण्यात आल्या आहेत. यात विद्यार्थ्यांना जी सोपी वाटते ती पद्धत वापरता येऊ शकते. इंग्रजीतील संख्या वाचन पद्धतीनुसार ही पद्धत करण्यात आली आहे. इतर सर्व प्रादेशिक भाषांमध्येही संख्या वाचन हे इंग्रजीप्रमाणेच असते, असे तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे हा बदल करण्यात आला आहे. हा बदल सर्व स्तरावर स्वीकारला गेल्यास यात विद्यार्थ्यांचा फायदा आहे.बºयाच विद्यार्थ्यांना जोडाक्षरे वाचताना व लिहताना त्रास होत होता, परंतु आताच्या बदललेल्या गणित विषयाच्या अभ्यासक्रमात वाचन सोपे झाले आहे
दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या गणित विषयाच्या वाचन पद्धतीत बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 5:08 PM
तब्बल दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर शाळा चालू झाल्या खऱ्या, परंतु या शैक्षणिक वर्षापासून बालभारतीने अभ्यासक्रम बदलास सुरुवात केली असून इयत्ता दुसरीच्या गणित पुस्तकातील गणित शिक्षणात आमुलाग्र बदल करण्यात आला आहे. संख्या वाचन करताना एकवीसऐवजी वीस एक, त्र्याहत्तर ऐवजी सत्तर तीन, त्र्याण्णव ऐवजी नव्वद तीन असे वाचण्याच्या सूचना अभ्यास मंडळाने दिल्या आहेत.
ठळक मुद्देजोडाक्षरे वाचण्यातून सुटका२१ ते ९९ या संख्यांमध्ये बदलशिक्षकांनी शिकविताना जोडाक्षरे न वाचता संख्यावाचन करून विद्यार्थ्यांना शिकवायचे आहे.संख्यावाचन करताना एकवीस ऐवजी वीस एक, त्र्याहत्तर ऐवजी सत्तर तीन, सदुसष्ट ऐवजी साठ सात, त्रेपन्न ऐवजी पन्नास तीन असे वाचन असणार आहेबदल का करण्यात आला - कारण इंग्रजी व्यतिरिक्त कानडी, तेलगू, तामिळ, मल्याळी या भाषेतसुद्धा संख्यावाचन हे याच पद्धतीने केले जाते, त्यामुळे याचा अवलंब करण्यात आला आहे.