चाळीसगाव - छत्रपती शिवाजी महाराज यांची २३ मार्च रोजी तिथीप्रमाणे जयंती साजरी करण्यात येणार असून चाळीसगाव शहरात पिर मुसा कादरी बाबा उर्फ बामोशी बाबा यांचा उरूसही साजरा होत आहे. बाबांच्या तलवारीची मिरवणूकदेखील २३ मार्च रोजी असल्याने दोघा मिरवणुकीचे मार्ग एकच आहे. त्यामुळे शिवजयंती उत्सवाच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.एकाच वेळेस दोघांही मिरवणुकीतील गर्दी या रस्त्यावरून जाणे शक्य होणार नसल्याने चाळीसगावचे पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी नजीर शेख, पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, शिवसेनेचे जिल्हा उप समन्वयक महेंद्र पाटील, तालुका प्रमुख रमेश आबा चव्हाण, शहर प्रमुख नानाभाऊ कुमावत, तालुका प्रवक्ते दिलीप घोरपडे, विधानसभा क्षेत्रप्रमुख भीमराव खलाने, दिनेश विसपुते, सुनील गायकवाड, शैलेंद्र सातपुते, नीलेश गायके, रामेश्वर चौधरी यांच्या उपस्थितीत चाळीसगाव पोलीस ठाण्यात समन्वय बैठक झाली. दोघे उत्सव उत्साहात साजरे व्हावेत या दृष्टिकोनातून शिवजयंती उत्सवाच्या मिरवणुकीच्या मार्गात यंदाच्या वर्षापुरता बदल करण्यात आला असून रेल्वे स्टेशन पासून निघणारी मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक सिग्नल पॉईंट चाळीसगाव पोलीस स्टेशन समोरून निघून प्रभात गल्ली येथे विसर्जन करण्यात येईल. या मिरवणुकीत सामील व्हावे असेही आवाहन करण्यात आले आहे.
चाळीसगाव येथे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 6:30 PM