लेझीमच्या सरावाने चौक गजबजले
By admin | Published: September 11, 2015 9:28 PM
गणेशोत्सवासाठी विविध मंडळांनी सरावाला सुरुवात केली आहे. शहरातील चौकाचौकात आणि रस्त्यांवर मध्यरात्रीर्पयत हा सराव सुरू आहे.
नंदुरबार : ढोल आणि ताशांच्या निनादात व लेझीमच्या लयीवर गणेश मंडळ कार्यकत्र्याची पावले थिरकू लागली आहेत. गणेशोत्सवासाठी विविध मंडळांनी सरावाला सुरुवात केली आहे. शहरातील चौकाचौकात आणि रस्त्यांवर मध्यरात्रीर्पयत हा सराव सुरू आहे. गणेशोत्सवातील लेझीम नृत्य हे एक वेगळेच आकर्षण असते. वेगळ्या धाटणीचे लेझीम नृत्य केवळ नंदुरबारातच पाहावयास मिळते. त्यासाठी खास नृत्य बसविणारेदेखील शहरात आहेत. गणेश स्थापना व विसर्जन मिरवणुकीच्या वेळी हे नृत्य केले जाते. त्यासाठीचा सराव सुरू झाला असून, गणेश मंडळाच्या कार्यकत्र्याची पावले लेझीमच्या तालावर थिरकू लागली आहेत. पूर्वी गणेश मेळ्यांमध्ये होणारे लेझीम नृत्य विविध तालीम संघांमध्ये स्पर्धा करणारे ठरायचे. दोन पावलीपासून 11 पावली लेझीम नंदुरबारची एक वेगळी ओळख आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणारी सर्व मंडळे लेझीमच खेळतात. त्यामुळे वेगवेगळ्या मंडळांचे लेझीम नृत्य पाहण्याची मजा काही औरच असते. पूर्वीच्या लेझीम नृत्यात व आताच्या लेझीम नृत्यात बराच बदल होत गेला असून आता केवळ त्याला हुल्लडबाजीचे स्वरूप येत असल्याच्या प्रतिक्रिया जुन्या जाणत्या मंडळींच्या आहे. मात्र काही तालीम संघ आजही लेझीमची परंपरा टिकवून आहेत. त्यामुळेच आधीपासूनच त्याचा सराव सुरू केला आहे.परंपरा टिकून लेझीम नृत्याची परंपरा पूर्वीपासूनच आहे. पूर्वी ढोल-ताशांऐवजी संभळ वाद्यावर ती खेळली जात असे. त्याची वेगळीच लय राहत होती. कालांतराने मोठे आवाज करणारे ताशे, ढोल आले. त्यांनी संभळची जागा घेतली. ढोल व ताशांच्या आवाजामुळे नृत्यात अधिकच जोश येऊ लागल्यामुळे ही वाद्ये तरुणांच्या पसंतीस उतरली आणि संभळ मागे पडले. आज प्रत्येक मंडळात कमीत कमी पाच ते सात ढोल व तेवढीच ताशे आहेत. त्यांच्या ठेक्यावर आता लेझीम खेळली जाऊ लागली आहे.पूर्वी गणेश विसर्जन मिरवणूक दोन ते अडीच दिवस चालत असे. त्यामुळे मंडळातील कार्यकत्र्याचे गट करून ठरावीक वेळासाठी ते लेझीम खेळत असत. त्यानंतर दुसरा गट लेझीम खेळण्यासाठी उतरत असे. त्यामुळे त्यांच्या वेगवेगळ्या शैली पाहण्याची मजाही येत असे. आता मात्र तसे राहिले नसल्याचे चित्र आहे.लेझीम नृत्याचे स्वरूप बदलत चालले आहे. पूर्वी लेझीम खेळणा:या व पाहणा:यालाही मजा येत असे. त्याचे विशिष्ट व लयबद्ध स्वरूप होते. तरुणीदेखील त्यात सहभागी होत असत. आता मात्र लेझीमचे स्वरूप हुल्लडबाजीचे झाले आहे. त्यामुळे लेझीम खेळणा:या तरुणींची संख्या नसल्यासारखीच आहे. विसर्जन मिरवणुकीत खेळण्यात येणा:या लेझीमची पद्धतही बदलत चालली आहे.नंदुरबार : ढोल आणि ताशांच्या निनादात व लेझीमच्या लयीवर गणेश मंडळ कार्यकत्र्याची पावले थिरकू लागली आहेत. गणेशोत्सवासाठी विविध मंडळांनी सरावाला सुरुवात केली आहे. शहरातील चौकाचौकात आणि रस्त्यांवर मध्यरात्रीर्पयत हा सराव सुरू आहे. गणेशोत्सवातील लेझीम नृत्य हे एक वेगळेच आकर्षण असते. वेगळ्या धाटणीचे लेझीम नृत्य केवळ नंदुरबारातच पाहावयास मिळते. त्यासाठी खास नृत्य बसविणारेदेखील शहरात आहेत. गणेश स्थापना व विसर्जन मिरवणुकीच्या वेळी हे नृत्य केले जाते. त्यासाठीचा सराव सुरू झाला असून, गणेश मंडळाच्या कार्यकत्र्याची पावले लेझीमच्या तालावर थिरकू लागली आहेत. पूर्वी गणेश मेळ्यांमध्ये होणारे लेझीम नृत्य विविध तालीम संघांमध्ये स्पर्धा करणारे ठरायचे. दोन पावलीपासून 11 पावली लेझीम नंदुरबारची एक वेगळी ओळख आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणारी सर्व मंडळे लेझीमच खेळतात. त्यामुळे वेगवेगळ्या मंडळांचे लेझीम नृत्य पाहण्याची मजा काही औरच असते. 4सध्या डीजे, बॅन्जोचा जमाना असला तरी नंदुरबारातील गणेश मंडळांनी पर्यायाने तालीम संघांनी लेझीमची परंपरा मात्र टिकवून ठेवली आहे. प्रत्येक मंडळ ढोल, ताशे यांच्याशिवाय दुसरे वाद्य वाजवित नसल्याचे चित्र आहे. काही तालीम संघांनी तर खास लेझीम पथकेही तयार केली आहेत. या पथकांना जिल्ह्यातूनही विविध कार्यक्रमांसाठी मागणी असते. लेझीम शिकविणारेदेखील शहरात आहेत.4नंदुरबारातील नवयुवक व्यायामशाळा व संभाजी व्यायामशाळा यांच्यातर्फे गोफ खेळण्यात येतो. विसजर्न मिरवणुकीत या गोफचे वेगळेच आकर्षण असते. त्यामुळे गोफचा सरावदेखील सध्या मोठय़ा प्रमाणावर सुरू आहे.