जळगाव - चारचाकी मालवाहू वाहनातून गाय, वासरु यांची निर्दयीपणे वाहतूक करणारा चालक नदीमखान समदखान (२२, रा.हुडको,शिवाजी नगर) व त्याच्यासोबत असलेल्या समशेरखान धासीखान (४०, रा.सीटी कॉलनी,गेंदालाल मील) व प्रफुल्ल संभाजी शिंदे (३४, रा.शांती नगर) या तिघांविरुद्ध शहर पोलीस स्टेशनमध्ये मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र देविदास नन्नवरे व योगेश भिकन पगारे हे गुरुवारी रात्री ११ वाजता जेवण झाल्यानंतर शतपावली करीत असताना शिवाजी नगर स्मशानभूमीजवळ मालवाहू वाहनातून (क्र.एम.एच.१९ बी.एम.८१८८) गुरांच्या ओरडण्याचा आवाज आला. हे वाहन थांबवून चालकाची चौकशी केली असता त्याच्याकडे गुरे वाहतुकीचा परवाना नव्हता व वाहनात गुरे कोंबून भरलेली होती. त्यामुळे हे वाहन शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथे राजेंद्र नन्नवरे यांच्या फिर्यादीवरुन चालक व त्याच्या दोघं साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दीड लाख रुपये किमतीचे वाहन व गुरे जप्त करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : अमेरिकेत भारतीय वंशाच्या डॉक्टरची कमाल; कोरोना रुग्णावर केली यशस्वी शस्त्रक्रिया
CoronaVirus News : मृत्यूनंतरही होताहेत हाल! 14 मृतदेहांचा 'तो' धक्कादायक Video व्हायरल
"आता आपल्याकडे मौनेंद्र मोदी आहेत ते..."; भारत-चीन सीमावादावरून पंतप्रधानांवर निशाणा
CoronaVirus News : बापरे! तब्बल 35 निगेटिव्ह लोकांना दिला कोरोनाचा 'पॉझिटिव्ह' रिपोर्ट अन्...
CoronaVirus News : आशेचा किरण! कोरोनाच्या लढ्याला यश येणार, मांजरींवरील 'हे' औषध प्रभावी ठरणार?
CoronaVirus News : धोक्याची घंटा! कोरोनामुळे जगात तब्बल 10 कोटी लोकांचा होऊ शकतो मृत्यू