जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत दुसरी घोषणा मालवाहतुकीसंदर्भात करण्यात आली. यामध्ये मालवाहतुकीच्या वाहनांवरील राष्ट्रीय परवाना शुल्कावरील जीएसटीत सूट देण्याचे सांगण्यात आले. मात्र याचा मालवाहतूकदारांना कोणताही लाभ होणार नसून भाडेही कमी होणे शक्य नसल्याचे मालवाहतूकदारांचे म्हणणे आहे.
कशी आहे जीएसटी स्थिती (टक्क्यांमध्ये)
घटक- सध्याचे प्रमाण -घोषणेनंतर
कर्करोग व इतर दुर्धर आजार औषधी - १२ ५
पेशी व स्नायूंवरील औषधी - १२ ०
इतर सर्व आजारांवरील औषधी - १२ १२