आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २७ - बांधकाम व्यावसायिक श्रीकांत खटोड व महाले कुटुंबियांनी मेहरुण शिवारातील सर्वे नं.४२४ अ व ब मधील ३ हेक्टर शासनाची जमीन स्वत:ची असल्याचे खरेदी खतात नमूद करून बनावट खरेदी खत तयार करीत शासनाचा ३ कोटी ७१ लाखांचा नजराणा बुडविल्याचा आरोप व्यापारी अजय ललवाणी यांनी शनिवारी संध्याकाळी ६ वाजता एका हॉटेलमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. या व्यवहाराला अपर जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती दिल्याचे त्यांनी सांगितले.पत्रकार परिषदेस सुमीत प्रकाशचंद मुथा,अॅड.के.बी.वर्मा उपस्थित होते. ललवाणी यांनी सांगितले की, मेहरुण शिवारातील तीन हेक्टर ही जागा शासनाने स्वातंत्र्य सैनिक स्व.विठ्ठल महाले यांना दिली होती. ही जमिन देताना कोणत्याही प्रकारचा वापर, हस्तांतरण हे जिल्हाधिकाºयांच्या पूर्व परवानगी शिवाय करता येणार नाही अशी अट टाकली होती. जिल्हाधिकाºयांची पूर्व परवानगी घेवून या जमिनीचे विभाजन व विल्हेवाट करायची असल्यास ९० टक्के नजराणा शासनाकडे भरण्याची अट शासनाने टाकली होती. त्यानुसार श्रीकांत महाले, संदीप महाले, रवींद्र महाले, मिलींद महाले यांनी आपल्याकडून ७९ लाखांची रक्कम घेत आपल्यासोबत जमिनीबाबत करारनामा केला. आपण शासनाचा ३ कोटी ७१ लाखांचा नजराणा भरण्याची तयारी देखील दर्शविली.या दरम्यान महाले कुटुंबियांनी श्री श्री इन्फ्रास्टक्चर प्रा.लि.चे श्रीकांत खटोड, श्रीराम खटोड, आदित्य खटोड, अक्षय खटोड, समर्थ खटोड व पुरुषोत्तम माधवाणी यांच्यासोबत शासनाची कोणतीही परवानगी न घेता किंवा नजराण्याची रक्कम न भरता खरेदी-विक्रीचा व्यवहार पूर्ण केला. हा व्यवहार करीत असताना दुय्यम निबंधकाची दिशाभूल व फसणूक करून २५ जानेवारी रोजी खरेदीखत करण्यात आले. या दरम्यान स्टॅम्प ड्युटीची बेकायदेशीररित्या माफी त्यांनी मिळविल्याचा आरोप केला.ललवाणींनी आरोप सिध्द करावा किंवा उठबशा काढाव्या- खटोडललवाणी यांचे आरोप बालीशपणाचे असल्याची प्रतिक्रीया श्रीकांत खटोड यांनी व्यक्त केली. जळगावातील एका सामान्य जमिनधारकासोबत आठ महिन्याची बोली करून ५ वर्षापर्यंत त्यांनी जमिनीची खरेदी केली नाही. या जमिनधारकाने आमच्यासोबत व्यवहार केला. शासनाला फसविल्याचे वैफल्यग्रस्त विधान अजय ललवाणी यांनी सिद्ध करून दाखवावे असे मी त्यांना जाहीर आव्हान देत आहे. अजय ललवाणी यांनी आरोप सिद्ध करून न दाखविल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी कान धरून उठबशा काढाव्यात, असे आव्हान खटाडे यांनी दिले.या प्रकारानंतर आम्ही बेकायदेशीररित्या जमिनीचे हस्तांतरण करीत शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी महाले व खटोड बंधुंच्या विरोधात तक्रार दाखल केली. अपर जिल्हाधिकºयांनी त्याची दखल घेवून मिळकत जैसे थे ठेवण्याचे आदेश दिल्याचे ललवाणी यांनी सांगितले.
जळगावात खटोड व महाले कुटुंबियांकडून फसवणूक, अजय ललवाणी यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 12:57 PM
३ कोटी ७१ लाखांचा शासनाचा नजराणा बुडविला
ठळक मुद्देललवाणींनी आरोप सिध्द करावा किंवा उठबशा काढाव्या- खटोड महाले व खटोड बंधुंच्या विरोधात तक्रार दाखल