ऑनलाईन लोकमतयावल,दि.28 - हजयात्रेसाठी जाणा:या शहरातील आठ तर भुसावळ येथील दोन अशा 10 भाविकांची दोन खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीने रक्कम घेवून फसवणूक केली आहे. हजयात्रेसाठी जावू न शकल्याने संतप्त झालेल्या यात्रेकरूनी मुंबई येथील पोलीस ठाण्यात दोन्ही कंपनीच्या मालकाविरूध्द गुन्हा नोंदविला आहे. हज यात्नेकरूंनी खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीकडे नाव नोंदणी केली होती. भाविकांकडून सुमारे अडीच ते तीन लाखांपर्यंतची रक्कम कंपनीने घेतल्याचे यात्रेकरूंनी सांगितले. यात्रेकरूंना 23 ऑगस्ट रोजी मुंबई येथे बोलावण्यात आले. दोन दिवस मुंबईत थांबल्यानंतर 25 ऑगस्टच्या पहाटे पाच वाजेला या भाविकांना जद्दा (साऊदी अरब) जाण्यासाठी विमान आहे, असे सांगितले. परंतू त्यापूर्वीच रात्री दीड वाजता या भाविकांना यात्ना रद्द झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या भाविकांनी मुंबईच्या मालाड ईस्ट पोलीस ठाणे गाठत दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
जळगावच्या हज यात्रेकरूंची मुंबईतील यात्रा कंपनीकडून फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 6:20 PM
यावल व भुसावळातील 10 भाविकांकडून प्रत्येकी अडीच लाखांची रक्कम घेत केली फसवणूक
ठळक मुद्देयावल व भुसावळ येथील 10 भाविकांची झाली फसवणूकयात्रा कंपनीने घेतले प्रत्येक भाविकाकडून अडीच ते तीन लाख रुपयेमुंबईत दोन दिवस भाविक थांबल्यानंतर ऐनवेळी यात्रा रद्द केल्याचा पाठविला निरोप