दीपनगर, ता. भुसावळ : औष्णिक विद्युत केंद्राकडून प्रदूषण मंडळाने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली होत आहे. आॅइल मिश्रीत पाणी भोगावती नदीत सोडले जात असून ते सांडपाण्यासोबत तापी नदीला जाऊन मिळत आहे. हेच पाणी भुसावळ आयुधनिर्माण फॅक्टरी, रेल्वे यांनी बांधलेल्या बंधाऱ्यात गेले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.माहिती अधिकारातून प्राप्त माहिती नुसार प्रकल्प बाधित गावांमध्ये अनेक वर्ष झाले तरी पर्यावरणाच्या नियमानुसार एकही झाड यांनी लावले नाही. वेल्हाळे, जडगाव, मन्यारखेडे व पिंप्रीसेकम भोगावती नदी परिसरात कोणत्याही उपाययोजना दिसत नाही. मात्र पर्यावरणाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयाचा निधी खर्च केला जातो. यातच आता ५०० प्रकल्पाच्या भिंतीला लागून वाहत असलेली भोगावती नदी पात्रात ६ ते ७ मीटर माती मुरुमांचा भराव टाकून नदी बुजवून रस्ता बनविला जात आहे.
भोगावतीत सोडले जातेय केमिकल युक्त पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 10:00 PM