जळगाव : चेतना व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने क्रीडा प्रशिक्षक आणि खेळाडू यांना 'चेतना क्रीडा सन्मान' देऊन गौरव करण्यात आला. यावेळी आमदार सुरेश भोळे, देवयानी गोविंदवार, सायकलपटू डॉ. अनघा चोपडे, क्रीडा प्रशिक्षक प्रवीण पाटील आणि केंद्राचे संचालक नितीन विसपुते उपस्थित होते. सोमवारी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक डॉ. अनिता पाटील, क्रीडा प्रशिक्षक प्रवीण पाटील, प्रा. विजय बागुल, प्रा. श्री.विलास पाटील, डॉ. विलास नारखेडे, प्रा. इकबाल मिर्झा, जितेंद्र पाटील, सचिन सोनार, सुमेध तळवलकर, नरेंद्र भोई यांना चेतना क्रीडा सन्मान देऊन गौरविण्यात आले, तर खेळाडूंमध्ये अनिरुद्ध जितेंद्र पाटील, सारिका शत्रुघ्न पाटील, साई राजेंद्र पाटील, विशाल विजय देसले, नंदिनी दुसणे, परीक्षित पाटील, वैष्णवी ज्ञानेश्वर पाटील, प्रीतम सोनार, लावण्या प्रदीप पाटील यांचा गौरव करण्यात आला. अमोल जोशी यांनी सूत्रसंचालन केले.