उंबरखेड, ता.चाळीसगाव, जि.जळगाव : येथील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या व नवसाला पावणाऱ्या कानुबाई माता मंदिराचा वर्धापन दिन व पाचवा छप्पनभोग कार्यक्रम उत्साहात पार पडला.उत्तर महाराष्ट्रासह पुण्यातील कानुबाई भक्तांनी पुणे व शिरपूर येथील डोंगर हिरवा ग्रुप व गोल्डन बॅण्डच्या तालावर चांगलाच फेर धरला. मालेगाव, पुणे, पाचोरा व स्थानिक भक्त मंडळांनी छप्पनभोग अर्थात छप्पन प्रकारचे खाद्यपदार्थ नैवेदासाठी ठेवले होते. यात दर्शन, होमहवन व महाप्रसादाचा लाभ दूरवरून आलेल्या सात-आठ हजार भाविकांनी घेतला. गावाला यात्रेचे स्वरूप आले होते. गावोगावाहून गाड्यांचा ताफा गावात दाखल झाला होता. घरोघरी दर्शनासाठी आलेल्या भक्तांनी गर्दी केली होती.येथील कानुबाई दैवत भक्तांचे मोठे श्रद्धास्थान आहे. या मंदिरात दर्शनासाठी मंगळवार व शुक्रवारी भाविकांची मोठी गर्दी होते. भाविक नवस करतात, व इच्छा पूर्ण झाल्यावर नवस फेडण्यासाठी येतात. चौधरी, माळी समाजातील नवविवाहित दाम्पत्य दर्शनासाठी या मंदिरात येतात. मंदिराच्या प्रमुख विश्वस्त इंदुबाई पाटील अशिक्षित आहेत, पण त्यांनी भक्तांच्या भरोश्यावर व साथीने छोट्याशा घरातील कानुबाई माता १८/२० लाखाच्या भव्य मंदिरात स्थापन केली. १५ वर्षांपूर्वी प्रथम मंदिरात एका दिवसात ६० ते ६५ हजार भाविकांनी दर्शन व प्रसादाचा लाभ घेतला होता. तेव्हापासून हे ‘कानुबाईचे उंबरखेड’ असा उंबरखेडच्या नावलौकिकात भर पडला आहे हे विशेष. दरवर्षी मंदिरात उत्सव होत असतात.
चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेड येथे कानुबाई माता मंदिरात छप्पनभोग कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2019 3:52 PM
उंबरखेड येथील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या व नवसाला पावणाऱ्या कानुबाई माता मंदिराचा वर्धापन दिन व पाचवा छप्पनभोग कार्यक्रम उत्साहात पार पडला.
ठळक मुद्देकानुबाई माता मंदिराचा वर्धापन दिनकानुबाई भक्तांनी धरला नृत्याच्या तालावर ठेकाबाहेरगावाहून आलेल्या हजारो भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ