चाळीसगाव, जि.जळगाव : पोलीस कवायत मैदानावर युगंधरा फाउंडेशनतर्फे ‘होम मिनिस्टर स्पर्धा घेण्यात आली. दोन दिवसीय चाललेल्या कार्यक्रमात महिलांनी या खुल्या व्यासपीठावर आपल्या अंगभूत कलांचे सादरीकरण केले. यावेळी अनेक स्पर्धां घेण्यात आल्या. यात पुष्पा बडगुजर ठरल्या होम मिनिस्टरच्या मानकरी.या स्पर्धेच्या गेल्या दोन दिवसांपासून प्राथमिक फेऱ्या संपल्याने अंतिम फेरी निवडीसाठी स्पर्धा झाली. समारोपप्रसंगी बेटी बचाओ अभियानाच्या राज्य संयोजिका प्रा.डॉ.अस्मिता पाटील, महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे, माजी नगराध्यक्षा पद्मजा देशमुख, उमंग समाजशिल्पीच्या संस्थापिका संपदा पाटील, उद्योजिका कविता कासलीवाल, डॉ.उज्वला देवरे, डॉ.चंदा राजपूत, वैष्णवी हिरे, हिरकणी महिला मंडळाच्या संस्थापिका सुचित्रा पाटील, ग्रीन मिशनच्या उमा चव्हाण, वसुधा पाटील, कलपना महाजन, प्रज्ञा शिंदे उपस्थित होते.एकापेक्षा एक बहारदार गाण्यांचा जणू रंगमंचावर पाऊसच पडला. यात आ.बं.हायस्कूल, हरणाताई जोशी माध्यमिक विद्यालय, सेंट जोसेफ, जयहिंद विद्यालय पूर्णपात्रे आदी शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.पुष्पा बडगुजर, लता जाधव, प्राजक्ता पाटील, पूजा पाटील या चारही स्पर्धकांना यजमानांसोबत अंतिम स्पर्धेत खेळण्याची संधी देण्यात आली. त्यात अनुक्रमे उभयतांना 'लागीर झालं जी', 'तुझ्यात जीव रंगला', 'होणार सून मी या घरची', 'जुळून येती रेशीमगाठी' या मराठी धारावाहिकेची शीर्षक देण्यात आली होती. त्यांचा परिचय उखाण्यातून व परस्परांबदलची माहिती विचारुन करवून घेण्यात आला. हातवारे द्वारे चित्रपटाची नावे ओळखणे, केसात स्ट्रा खोचणे, पताका चिटकविणे, बाटलीतून पाणी भरणे, एका मिनिटात जास्तीत जास्त बॉल प्लॅस्टिक बादलीत टाकणे आदी स्पर्धा घेण्यात आल्या.कामिनी अमृतकर यांनी दिमाखदार शैलीत सूत्रसंचालन करीत प्रेक्षकांना खिळवून ठेवले तर मु.जे.महाविद्यालयीन चमुने शानदार नियोजन करीत स्पर्धेत रंगत आणली होती. यशस्वीतेसाठी दिलीप जाधव, स्वप्नील कोतकर, दिलीप पाटील, छाया पाटील, भास्कर भोई, रफिक शेख आदींनी परिश्रम घेतले.पैठणीच्या मानकरी ठरलेल्या पुष्पा बडगुजर यांचा मान्यवरांच्या हस्ते मानाची पैठणी, ताज, रिबीन, स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. द्वितीय बक्षीस लता जाधव, उत्तेजनार्थ प्राजक्ता पाटील, विशेष सन्मान पूजा पाटील व कलाकर्र्तृत्वाचा सन्मान स्वाती देशमुख यांना म्हणून गौरविण्यात आले. भेटवस्तू, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र देवून विजेत्यांना गौरवण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देवून गौरवण्यात आले. यावेळी अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, शहर पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे पाटील, मेहुणबारे ग्रामीणचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे आदी मान्यवर उपस्थित होते.
चाळीसगावला पुष्पा बडगुजर ठरल्या ‘होम मिनिस्टर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 4:11 PM
युगंधरा फाउंडेशनतर्फे ‘होम मिनिस्टर स्पर्धा घेण्यात आली. दोन दिवसीय चाललेल्या कार्यक्रमात महिलांनी या खुल्या व्यासपीठावर आपल्या अंगभूत कलांचे सादरीकरण केले. यावेळी अनेक स्पर्धां घेण्यात आल्या. यात पुष्पा बडगुजर ठरल्या होम मिनिस्टरच्या मानकरी.
ठळक मुद्देमहिलांनी आपल्या अंगभूत कलांचे केले सादरीकरणया वेळी घेण्यात आल्या अनेकविध स्पर्धादोन दिवसांच्या प्राथमिक फेरीनंतर झाल्या अंतिम स्पर्धा