शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

छटपूजा : विश्वशांती, सुख-समृद्धीसाठी प्रार्थना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 10:34 PM

उत्तर भारतीय संघ छट पूजा समितीतर्फे आयोजन

ठळक मुद्दे३६ तासांचे निर्जला व्रत व सूर्यास अर्घ्यदीर्घायुष्यासाठी प्रार्थना

जळगाव : उत्तर भारतीय संघ छट पूजा समितीतर्फे आयोजित छट पूजेदरम्यान उत्तर भारतीयांतर्फे सुख, समृद्धी, समाधान,आरोग्यासह विश्वशांतीसाठी प्रार्थना करण्यात आली. शहरातील ७ ते ८ हजार समाजबांधवांनी या उत्सवात सहभाग नोंदविला.या वेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, महापौर सीमा भोळे, प्रभाकर सोनवणे, डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, अनंत जोशी, प्रशांत नाईक, डॉ. विश्वनाथ खडके आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी निंबाळकर यांच्याहस्ते पूजा करण्यात येऊन सोहळ््यास सुरुवात झाली.भजन व लोकगीते सादरसंध्याकाळी ५ वाजेपासून ते सूर्यास्तापर्यंत छटी मातेची ही पूजा करण्यात आली. यावेळी महिलांनी पाण्यात उभे राहून हातात पूजेची थाली धरत सूर्याला नमन केले मावळत्या सूर्याला यावेळी अर्घ्य देण्यात आले. पहिली पूजा व अर्घ्य हे मंगळवारी झाले. पूजेतून षष्ठी मातेची स्तुती करण्यात आली व भजन कीर्तन तसेच पारंपरिक लोकगीते, सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. गायिका प्रियंका मौर्या (मुंबई) यांनी गीत, भजन सादर केले.रात्रभर सत्संग, भजन होऊन दुसऱ्या दिवशीदेखील पूजा करण्यात येणार आहे. यात दुसरे अर्घ्य बुधवारी पहाटे ५ वाजेपासून ते सूर्याेदयापर्यंत पूजा करून देण्यात येणार आहे. त्यानंतर ज्यांचे उपवास आहे ते गरम दूध किंवा चहा सेवन करून आपला उपवास सोडतील.दीर्घायुष्यासाठी प्रार्थनाछट म्हणजे सूर्य, सूर्यापासूनच सृष्टीची उत्पत्ती असून तेच सर्वांचे पालन पोषणकर्ते आहे म्हणून सूर्यदेवाची आराधना यात केली जाते. यावेळी प्रत्येकाने आपल्या आरोग्य, सौभाग्य, समृद्धी, दीर्घ आयुष्य, पूत्रप्राप्ती, यश-कीर्ती, कष्ट निवारण करण्यासाठी, मनोकामनापूर्ती तसेच शांतीसाठी या वेळी प्रार्थना करण्यात आली.चतुर्दशीपासून या पर्वास सुरूवात झाली. यादिवशी तलावावर स्नान करीत घरातील साफसफाई केली जाते. तसेच दुधी भोपळ्याची भाजी खाण्यात येते. तर पंचमीस गुळाची खीर खाऊन रात्रीपासून निर्जला उपवासाची सुरुवात झाली. त्यानंतर षष्ठीला फळे, दीपदान यांनी सूर्याची पूजा करण्यात आली.या वेळी संस्थापक अध्यक्ष ललन यादव, उपाध्यक्ष मनोहर साहनी, कार्याध्यक्ष चंदन साहनी, सचिव रामनरेश मौर्या, अमित यादव, कृष्णा चौधरी, दयाशंकर विश्वकर्मा, रमाकांत गौड, यशवंत मिश्रा, राजेश यादव, प्रकाश सिंग, राजेश सहानी, राजेश विश्वकर्मा, रणधिर सिंह आदी उपस्थिती होते. गेल्या १७ वर्षांपासून ही पूजा मेहरुण तलावावर सामूहिकरीत्या आयोजितकेलीजाते.सूत्रसंचालन रामनरेशमौर्यायांनीकेले.३६ तासांचे निर्जला व्रत व सूर्यास अर्घ्यसमितीच्यावतीने मंगळवारी शहरातील उत्तर भारतीय समाजबांधवांसाठी मेहरुण तलावावरील गणेश घाटावर छट पूजेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उत्तर भारतीयांतर्फे ३६ तासांच्या निर्जला व्रत करीत प्रार्थना करण्यात आली. पंचमीच्या रात्रीपासून सुरू झालेले हे ३६ तासांचे निर्जला व्रत बुधवारी पहाटे सूर्याेदया प्रसंगी सूर्यास अर्घ्य देऊन पूर्ण होईल.दिव्यांनी उजळला मेहरुण तलावगणेश घाटावर यावेळी समाजबांधवांसाठी मंडप उभारण्यात आले होते. त्याचप्रमाणे आकर्षक रोशणाई करण्यात आली होती. यावेळी दीपदान करण्यात आले. दिव्यांनी गणेश घाट व मेहरुण तलाव परिसर उजळून निघाला.

टॅग्स :Indian Traditionsभारतीय परंपराJalgaonजळगाव