चाळीसगाव, जि.जळगाव : भाजपच्या पंचायत समितीच्या मेहुणबारे गणाच्या सदस्या रुपाली पीयूष साळुंखे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी रविवारी पोटनिवडणुकीत ४६.५५ टक्के मतदान झाले. २४ जून रोजी तहसिलदार कार्यालयात मतमोजणी होणार आहे. भाजपच्या सुनंदा सुरेश साळुंखे आणि राष्ट्रवादीच्या जयश्री नरेश साळुंखे यांच्यात चुरशीची सरळ लढत झाली.८६५६ पुरुष, ७९३७ अशा एकूण १६,५९३ मतदारांपैकी ७७२४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. ४२९० पुरुष आणि ३४३४ मतदांनी मतदान केले. या पोटनिवडणुकीत विजयामुळे पंचायत समितीतील पक्षीय बलाबल बदलणार असल्याने भाजप आणि राष्ट्रवादीने जोरकस प्रचार केला. रविवारी खासदार उन्मेष पाटील यांनी मेहुणबारे येथील मतदान केंद्रावर जाऊन आढावा घेतला. सोमवारी सकाळी १० वाजता मतमोजणी होणार आहे. ११ वाजता निकाल जाहीर होईल. निवडणूक अधिकारी म्हणून नानासाहेब आगळे यांनी कामकाज पाहिले.हिंगोणे येथेही एका प्रभागात मतदानहिंगोणेसीम येथील ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक तीनमध्येही रविवारी पोटनिवडणुकीत मतदान झाले. एकूण ७१.६१ टक्के मतदान नोंदविले गेले. एकूण ३६० मतदारांपैकी २६५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पं.स.पोटनिवडणुकीत ४६ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 10:41 PM
भाजपच्या पंचायत समितीच्या मेहुणबारे गणाच्या सदस्या रुपाली पीयूष साळुंखे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी रविवारी पोटनिवडणुकीत ४६.५५ टक्के मतदान झाले.
ठळक मुद्देआज होणार मतमोजणीहिंगोणे येथेही एका प्रभागात मतदान