चोपडा, जि.जळगाव : ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागण्या मंजूर कराव्यात यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी तहसील कार्यालय गाठले आणि विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार महेश साळुंखे यांना दिले.निवेदनात म्हटले आहे की, ६० वर्षे पूर्ण झालेल्यांना ज्येष्ठ नागरिक संबोधून त्यांना सर्व शासकीय सवलतीच्या फायदा द्यावा, ज्येष्ठ नागरिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद करावी, श्रावण बाळ वार्धक्य निवृत्ती वेतनात ६०० ऐवजी २००० निवृत्ती वेतन द्यावे, विनामूल्य आरोग्य सेवा मिळावी, स्वतंत्र विभाग आयुक्तालय सुरू करावे, प्रत्येक बँकेत स्वतंत्र खिडकीची व्यवस्था करावी, शेतकरी, शेत मजूर व ६० वर्षावरील सर्व प्रकारच्या दारिद्र्य रेषेखालील मजुरांना दरमहा पाच हजार रुपये निवृत्ती वेतन द्यावे अशा आशयाचे निवेदन संघाचे अध्यक्ष विजय करोडपती, उपाध्यक्ष मुरलीधर पाटील, मधुकर बाविस्कर, जयदेव देशमुख, लक्ष्मण मराठे, दिलीप पाटील, वाय. डी. मैलागीर, विजया भारंबे, एन. डी. महाजन यांच्यासह इतरांनी दिले.
चोपडा येथे ज्येष्ठ नागरिकांची तहसीलवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2019 4:25 PM
ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागण्या मंजूर कराव्यात यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी तहसील कार्यालय गाठले आणि विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार महेश साळुंखे यांना दिले.
ठळक मुद्देतहसीलदारांना दिले निवेदनदरमहा पाच हजार रुपये निवृत्ती वेतन द्यावेज्येष्ठ नागरिक धोरणाची अंमलबजावणी करावी