आॅनलाईन लोकमतपिलखोड, ता.चाळीसगाव, दि.२२ : गेल्या पंधरवड्यात शार्प शूटरने बिबट्याला ठार केल्याची घटना ताजी असतानाच या परिसरात पुन्हा बिबट्याचे दर्शन झाले आहे. चाळीसगाव व मालेगाव तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या शिवारात बिबट्याने चक्क जलवाहिनीवरून प्रवास करताना २१ रोजी सायंकाळी नागरिकांनी पाहिले.
या घटनेला आज पंधरवडा उलटत नाही तोच चाळीसगाव व मालेगाव तालुक्याच्या सीमेवर, पिलखोडजवळ जलवाहिनीवरून बिबट्या जाताना नागरिकांनी पाहिला. २१ रोजी सायंकाळी हा बिबट्या दिसल्याचा दावा नागरिकांनी केला असून, त्याचे मोबाइलमध्ये चित्रीकरण केले आहे.