जळगाव : ‘अनुलोम’ या खाजगी संस्थेच्यावतीने जैन हिल्स येथे ७ रोजी आयोजित अनुलोम संगम कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे रविवारी सकाळी ११.३५ वाजता जळगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांचा हा खाजगी दौरा आहे. जैन हिल्स येथील गांधी तीर्थ येथे आयोजित कार्यक्रमास त्यांची उपस्थिती असेल. त्यानंतर दुपारी १.५५ वाजता ते मुंबईकडे रवाना होणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे आज सकाळी साडेअकराच्या सुमारास शासकीय विमानाने जळगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले. विमानतळावर वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्वला पाटील, आमदार स्मिता वाघ, आमदार चंदुलाल पटेल, आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदकुमार महाजन यांनी तर प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, यांनी स्वागत केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांचे जळगावात आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 12:19 PM
‘अनुलोम’ या खाजगी संस्थेच्यावतीने जैन हिल्स येथे ७ रोजी आयोजित अनुलोम संगम कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे रविवारी सकाळी ११.३५ वाजता जळगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांचा हा खाजगी दौरा आहे.
ठळक मुद्देअनुलोम संगम कार्यशाळेसाठी दाखल विमानतळावर पालकमंत्र्यांनी केले स्वागत