आॅनलाईन लोकमत,जळगाव, दि.२७- भागपूर उपसा सिंचन योजनेच्या कामाला मंजुरी मिळून आता सुमारे दोन दशकांचा कालावधी उलटला, मात्र निधीअभावी हे काम अद्यापही सुरूच झालेले नाही. या योजनेत नंतर समाविष्ट केलेले बंधाºयाच्या उंचीवाढीचे काम तेवढे पूर्ण झाले आहे. आता या योजनेच्या कामाचा मुख्यमंत्र्यांच्या पुढील आठवड्यातील दौºयात उद्घाटन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.प्रशासकीय मान्यतेचा घोळया योजनेस तापी पाटबंधारे महामंडळाने १ मार्च १९९९ रोजी प्रशासकीय मान्यता दिली होती. त्यावेळी या योजनेचा खर्च ४३८ कोटी १४ लाख ५४ हजार रुपये होता. मात्र हा प्रकल्प सुरू न झाल्याने प्रकल्प खर्चात वाढ झाली. १ सप्टेंबर १९९९ रोजी या प्रकल्पाच्या ५५७ कोटी २ लाख १४ हजार रुपये किंमतीस तापी महामंडळाने नव्याने प्रशासकीय मान्यता दिली. आता या किंमतीत आणखी वाढ झाली आहे.अशी आहे योजना...या योजनेंतर्गत भागपूर उपसा सिंचन योजना व शिरसोली-२ लघु पाटबंधारे तलाव प्रकल्पाचा समावेश आहे. या योजनेंतर्गत तापी नदीवरील शेळगाव बॅरेजच्या जलाशयातून वाघूरमध्ये येणारे पुराचे पाणी वाघूर नदीच्या काठावर कडगाव गावाजवळ जॅकवेल बांधून उचलण्यात येणार आहे. जॅकवेलपासून रायझिंग मेन द्वारे दोन टप्प्यात पाईपलाईनद्वारे भागपूर धरणात पाणी साठविणे प्रस्तावित आहे. त्यासाठी १८८.५० दलघमी साठवण क्षमतेचे भागपूर धरण बांधणे प्रस्तावित आहे. तसेच शिरसोली-२ या लघु पाटबंधारे तलावाची उंची वाढवून १.३९ दलघमी पाणीसाठा वाढविणे या योजनेत समाविष्ट आहे. १८१४१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणारभागपूर मध्ये १८८.५० दलघमी पाणी साठा होणार आहे. भागपूर धरणाच्या मागच्या उंच भागास उपसा सिंचनाने १७ हजार ८३० हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी पाणी पुरविण्यात येईल. तसेच या धरणातून जळगाव शहरासाठी ८१.३४ दलघमी (२.८७ टीएमसी) पाणीसाठा ठेवण्यात आला आहे. तर शिरसोली-२ (नायगाव) ल.पा. तलावात २.४० दलघमी पाणीसाठा होणार असून त्यामुळे या परिसरातील ३११ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. प्रवाही पद्धतीने हे सिंचन होणार आहे. या योजनेमुळे एकूण १८१४१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.जळगाव व जामनेर तालुक्याला याचा लाभ होणार आहे.भागपूरचे होणार पुनवर्सनया उपसा योजनेसाठी ७४२ हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. यापैकी २७९ हेक्टर वनजमीन आहे. या वनजमीनीबाबतची परवानगी मे २००२ मध्ये मिळाली आहे. तर पर्यावरण विभागाची मान्यताही आॅक्टोबर २००२ मध्ये मिळाली आहे.तर या प्रकल्पाला केंद्रीय जलआयोगाची तत्वत मान्यता जून २००२ मध्ये प्राप्त झाली
भागपूर उपसा सिंचन योजनेच्या कामाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभाच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 10:42 PM
दोन दशकांपासून मंजुरी मिळून रखडलाय प्रकल्प
ठळक मुद्दे जळगाव, जामनेर तालुक्याला लाभनिधीअभावी कामाला सुरूवातच नाही१८१४१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार