ऑनलाइन लोकमतधुळे, दि. 16 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 17 मे रोजी धुळे जिल्हा दौ:यावर येत आहे. त्यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचे उद्घाटन, जलयुक्त शिवार आणि प्रधानमंत्री आवास योजनेतील कामांची पाहणी तसेच सायंकाळी सहा वाजता पांझरा नदी काठावर जाहीर सभा आणि जनसंवादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नंदुरबार जिल्ह्यातील कार्यक्रम आटोपून दुपारी 2.05 वाजता हेलिकॅप्टरने साळवे ता. शिंदखेडा येथे आगमन होईल. जलयुक्त शिवार, प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामाची पाहणी करतील. त्यानंतर शासकीय वाहनाने दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी शिंदखेडा येथे आगमन होऊन मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत वरपाडा रस्त्याचे भूमीपूजन त्यांच्याहस्ते होणार आहे. दुपारी 2.55 वाजता शिंदखेडा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन होऊन त्याच ठिकाणी जिल्हा आढावा बैठकीस उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी 4 वाजता साळवे येथून हेलिकॉप्टरने धुळ्यातील जिल्हा पोलीस कवायत मैदानावर मुख्यमंत्र्यांचे आगमन होणार असून दुपारी 4 वाजून 45 मिनिटांपासून सायंकाळी 5 वाजून 45 मिनिटांर्पयत राखीव वेळ असून विविध शिष्टमंडळ भेटीगाठी घेणार आहेत. सायंकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनच्या नूतन इमारतीचे भूमीपूजन फडणवीस यांच्याहस्ते होणार असून त्यानंतर कुमार नगर नकाणे रोड मार्गे पांझरा नदी तळफरशी पुलाचे लोकार्पण होऊन सायंकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी पाझंरा नदीकाठावरील सभा स्थळावरुन विशेष निधी अंतर्गत रस्ता कामाचा शुभारंभ, आदर्श पोलीस चौकी व भाजी विक्रेत्यासाठी बांधलेल्या ओटयांचे लोकार्पण त्याच्याहस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री जनसंवाद कार्यक्रमासही उपस्थित राहणार असून हा कार्यक्रम संपल्यावर ओझर विमानतळाकडे ते प्रयाण करतील.
मुख्यमंत्र्यांहस्ते 17 रोजी धुळ्य़ात विविध विकास कामांचे उद्घाटन
By admin | Published: May 16, 2017 3:06 PM