जळगाव : भोसरी जमीन प्रकरणात माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसेंच्या बँक खात्यावरूनच ५० लाख रूपये मंदाकिनी खडसे यांच्या खात्यात वर्ग करून भोसरीची जमीन घेतली असताना खडसेंना क्लिनचीट कशी मिळते? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खडसेंना घाबरतात का? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बुधवार, २० जून रोजी दुपारी पत्रकार भवनात आयोजित पत्रपरिषदेत केला.खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या दमानिया व त्यांच्या सहकाºयांनी खडसेंविरोधात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेत जोडलेले डीडी बनावट तयार केले असल्याने त्याची चौकशी व्हावी, अशी तक्रार खडसे यांनी केली होती. त्यानुसार मुक्ताईनगरला गुन्हा दाखल केला. त्यात तपास अधिकारी कडलग हे थेट मुंबईला दमानिया यांच्या चौकशीसाठी गेले. त्यासंदर्भात म्हणणे सादर करण्यासाठी जळगावात आलेल्या दमानिया यांनी दुपारी ३ वाजता पत्रकार भवनात पत्रपरिषद घेतली.त्या म्हणाल्या की, भोसरी प्रकरणी खडसेंना क्लीनचीट घाईघाईत देण्यात आली. भाजपाची विकेट जाण्याच्या मार्गावर असल्याने मते जाऊ नयेत, खडसे पक्षाबाहेर जाऊ नये म्हणून की मुख्यमंत्री फडणवीस त्यांना घाबरतात म्हणून क्लीनचीट दिली? असा सवाल केला. भोसरी प्रकरणी एसीबीने दिलेल्या ‘सी’ समरीच्या विरूद्ध प्रोटेस्ट अर्ज दाखल केला असल्याचेही त्यांनी सांगितले.दमानिया म्हणाल्या की, खडसेंविरोधात २७ डिसेंबर २०१६ ला उच्च न्यायालयात पीआयएल दाखल केली. त्याआधीच त्याची कॉपी सर्व प्रतिवादींना पाठविली होती. त्यानुसार खडसेंनाही मिळाली. या कॉपीसोबत दोन डीडीच्या झेरॉक्स कॉपीही आहेत. त्यांनी ३ जानेवारी २०१७ ला अॅक्सीस बँकेला तसेच चोपडा अर्बन को-आॅप बँकेला पत्र लिहून १० लाख तसेच९ कोटी ५० लाखांच्या डीडी कोणाच्या खात्यातून काढण्यात आला? त्याच्या क्लिअरन्सबाबत माहिती विचारली. त्या पत्रासोबत डीडीच्या कॉपीही जोडल्याचा उल्लेख आहे. त्यावर अॅक्सीस बँकेने दिलेल्या उत्तरात चोपडा अर्बन बँकेने काढलेला ९ कोटी ५० लाखांचा ७६०५९६ क्रमांकाचा चेक आढळून आला. मात्र तो वटविण्यात आलेला नसल्याचे कळविले. तर चोपडा अर्बन बँकेने पाठविलेल्या दाखल्यात असे कुठलेही व्यवहार झालेले नसल्याचे ५ जानेवारी २०१७ रोजी कळविले. तर त्याच दिवशी आणखी एक पत्र चोपडा बँकेच्या व्यवस्थापक व अवसायकांनी खडसे यांना पाठवून तसा व्यवहार झाला नसल्याचे तसेच खडसे हे बँकेचे सभासद व खातेदारही नसल्याचे कळविले. असे असताना खडसे यांनी १४ जानेवारी २०१७ रोजी हितचिंतकाचा घरच्या क्रमांकावर फोन आला व त्याने संक्रांतीच्या शुभेच्छा देऊन डीडीच्या दोन कॉपी लेटरबॉक्समध्ये टाकल्या आहेत. त्यांचा गैरवापर करून तुमच्याविरोधात षडयंत्र रचले जात आहे, असे सांगितल्याची स्टोरी पोलीस अधीक्षकांना का सांगितली? की पोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक सुपेकर व पोलीस निरीक्षक चंदेल यांच्याच सांगण्यावरून त्यांनी ही स्टोरी तयार केली. कारण असे केले नसते तर या प्रकरणात पोलीस तपास करू शकले नसते. खडसेंनी उच्च न्यायालयासमोरच ही बाब मांडून त्याची चौकशी करावी अशी मागणी का केली नाही? असा सवाल केला. तसेच न्यायदंडाधिकाºयांसमोरही खोटेच चित्र निर्माण केले गेले. तर उच्च न्यायालयात पुन्हा अर्ज देऊन पीआयएलची माहिती मिळाली नसल्याने ती मिळण्याची मागणी केली. या सर्व प्रकाराची चौकशी करून खडसेंवर कारवाई करावी. त्यांना आमदारकीपासून निलंबित करावे, अशी मागणी उच्च न्यायालय तसेच विधानसभेच्या सभापतींकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.दमानिया म्हणाल्या की, मंत्रीपद गेल्याने व वाढत्या वयामुळे आमदार खडसे यांचे मानसिक संतुलनही ढळत आहे. दररोज ते मला छळण्यासाठी नवनवीन क्लृप्त्या शोधून काढतात. मागील आठवड्यात त्यांनी त्यांच्याविरोधात हायकोर्टात जनहित याचिका दाखल करणाºया माझ्यासह व अन्य ५ याचिकाकर्त्यांविरूद्ध खोटी व बनाव केलेली फिर्याद दाखल केली. त्यात आम्ही चोपडा अर्बन बँकेतून डीडी चोरले, स्टॅम्प चोरले, खडसेंचे नाव त्यात घालून त्यांना गोवण्याचे षडयंत्र रचले, असा आरोप केला.तर मला अटक करा...त्या म्हणाल्या की, तपास अधिकारी कडलग यांनी जर कागदपत्रांची आधीच चौकशी करून तपास केला असता तर मुंबईपर्यंत यायची गरजच भासली नसती. त्यामुळे जर डीडीची चोरी केली असेल, बनावट केले असतील अथवा खोटे नाव टाकले असेल तर मी स्वत: जळगावला येऊन अटक करा. मी स्वत: जळगावला येईल, असे सांगितले होते. त्यानुसार जळगावात आली आहे. जर मी चोरी केली असेल किंवा बनावट डीडी तयार केला असेल तर मला अटक करावी. हिंमत असेल तर अटक करूनच दाखवा.खडसेच करतात षडयंत्र‘षडयंत्र’ हा शब्द खडसेंना अधिक आवडतो, असे दिसते. प्रत्यक्षात तेच स्वत: दुसºयांविरोधात षडयंत्र करीत असतात, अशी टीकाही दमानिया यांनी केली.२६ दावे, २ धमक्यादमानिया म्हणाल्या की, भ्रष्टाचाराविरोधात उभी राहिल्याने खडसेंकडून मानसिक छळ करण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यासाठी आतापर्यंत जळगाव, बुलढाणा, नंदुरबार, जालना नाशिक या ठिकाणी २६ बदनामीचे दावे दाखल केले आहेत. गुन्हेगारी विश्वातून दोन धमक्याही मिळाल्या आहेत. त्यात एक धमकी रवि पुजारी टोळीकडून मिळाली आहे. २ वेळा कोर्टात चुकीची माहिती देऊन नॉन बेलेबल वॉरंट पाठविले. दुसºया वेळी मी स्वत: हजर राहून बाजू मांडली. खट्टी-मिठी बाते करे.... असे लिहिलेल्या चिठ्ठीवर माझे नाव व नंबर टाकून त्या चिठ्ठ्या विविध रेल्वेंमध्ये तसेच पोलीस स्टेशनमध्येही लावण्यात आल्या आहेत. हे सांगत असताना त्यांचे डोळे पाणावले.भुजबळांच्या माणसाची मदतदमानिया म्हणाल्या की माझ्याविरूद्ध दोन गुन्हेही नोंदविण्यात आले. त्यासाठी छगन भुजबळ यांच्या माणसाची मदत घेण्यात आली.
मुख्यमंत्री खडसेंना घाबरतात का?: अंजली दमानिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 2:30 PM
भोसरी जमीन प्रकरणात माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसेंच्या बँक खात्यावरूनच ५० लाख रूपये मंदाकिनी खडसे यांच्या खात्यात वर्ग करून भोसरीची जमीन घेतली असताना खडसेंना क्लिनचीट कशी मिळते? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खडसेंना घाबरतात का? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बुधवार, २० जून रोजी दुपारी पत्रकार भवनात आयोजित पत्रपरिषदेत केला.
ठळक मुद्देमाजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर केले विविध आरोपअंजली दामानिया यांनी सांगितली ‘डीडी’ची कहाणीमाजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा तोल ढळतोय...