आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२१- सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे मंत्री होण्यापूर्वी शेतकरी व सामान्यांच्या प्रश्नी खूप बोलायचे. मात्र त्यांचा आवाजच आता बंद झाला आहे अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रपरिषदेत केली.यावेळी ते म्हणाले की, शिवसेना दुतोंडी असून मुख्यमंत्र्यांनी डोळे वटारले की, या वाघाचे गुरगुरणे बंद होते. भाजपा आणि सेना या दोन्ही पक्षातील कुरघोडी आणि कुरबुरीच्या प्रकारामुळे फुकटचा तमाशा लोकांना पहायला मिळत आहे, असेही तटकरे म्हणाले.फक्त फसव्या घोषणा करण्यापलीकडे या सरकारने काहीच केलेल नसून शेतकºयाला अजुनही कर्जमाफी मिळालेली नाही, बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकºयांना हेक्टरी ३० हजार रुपये देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. परंतु अद्याप ही मदत दिलेली नाही. आम्ही हल्लाबोल आंदोलनामध्ये शेतकरी आणि जनतेपर्यंत पोहचत असून सरकारविरोधात जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. उत्तर महाराष्ट्रातील सभाही न भूतो न भविष्यती अशा होत आहेत. सरकारविरोधात जनताच रस्त्यावर उतरत आहे.शेतकºयांना सरसकट कर्जमाफी होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणारतटकरे म्हणाले की, शेतकºयांची कर्जमाफी, शेतकºयांच्या आत्महत्या आणि धर्मा पाटील यांची आत्महत्या हे विषय येत्या अधिवेशनामध्ये आम्ही लावून धरणार आहोत. जोपर्यंत शेतकºयांना न्याय मिळत नाही आणि सरसकट कर्जमाफी दिली जात नाही तोपर्यंत राष्ट्रवादीचे आंदोलन सुरुच ठेवणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी डोळे वटारले की शिवसेनेच्या वाघाचे गुरगुरणे बंद : सुनील तटकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 6:40 PM
सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे मंत्री होण्यापूर्वी शेतकरी व सामान्यांच्या प्रश्नी खूप बोलायचे. मात्र त्यांचा आवाजच आता बंद झाला आहे अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रपरिषदेत केली.
ठळक मुद्देसरसकट कर्जमाफी होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादीचे आंदोलन सुरुच ठेवणारभाजपा आणि सेना यांच्यातील कुरघोडी आणि कुरबुरीमुळे जनतेचे मनोरंजनसहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे मंत्री होण्यापूर्वी शेतकरी व सामान्यांच्या प्रश्नी खूप बोलायचे. मात्र त्यांचा आवाजच आता बंद झाला.