जळगाव : मध्यप्रदेशातील विधानसभेच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी औरंगाबादहून हेलिकॉप्टरने जात असताना जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना जळगाव येथून सोबत घेण्यासाठी जळगाव विमानतळावर धावती भेट दिली. यावेळी त्यांनी जळगावच्या प्रसिद्ध भरीत व भाकरीचा आस्वाद घेतला.मध्यप्रदेशात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्टÑालगत असलेल्या काही जिल्ह्यांमधील उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. बºहाणपूर येथे शनिवारी त्यांच्या चार सभा होत्या. त्यासाठी मुख्यमंत्री हे औरंगाबाद येथून हेलिकॉप्टरने जळगाव विमानतळावर दुपारी ११.४५ वाजता आले. मुख्यमंत्री येणार म्हणून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील, महापौर सिमा भोळे, माजी आमदार डॉ. गुरू मुख जगवाणी, मनपातील गटनेते भगत बालाणी, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे तसेच अरविंद देशमुख यांच्यासह अन्य पदाधिकारी, नगरसेवक विमानतळावर पोहचले.यावेळी विमानतळावर कडेकोट बंदोबस्त होता. काही कार्यकर्ते व नगरसेवकांनाही प्रवेश नाकारण्यात आला. तर मुख्यमंत्री बाहेर येऊन भेटतील अशी अपेक्षा उपस्थितांची होती मात्र ते बाहेर न आल्याने उपस्थितांचा हिरमोड झाला.आमदार भोळेंनी दिला डबाजळगाव विमानतळावर हेलिकॉप्टर १० मिनीटे थांबले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे हेलिकॉप्टर आसनस्थ झाले. यावेळी त्यांच्या समवेत मुख्यमंत्र्यांसाठी आमदार भोळे यांनी दिलेला भरीत व कळण्याच्या भाकरीचा डबा होता. मुख्यमंत्र्यांनी आस्वाद घेतला व हेलिकॉप्टर बºहाणपूरकडे रवाना झाले.
मुख्यमंत्र्यांनी घेतला जळगावातील भरीत-भाकरीचा आस्वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 1:12 PM