शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
2
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
3
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
4
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
5
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
6
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
7
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
8
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
9
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
10
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
11
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
12
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
13
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
14
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
15
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
16
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
17
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
18
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
19
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
20
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  

साकेगाव येथे शालेय विद्यार्थ्यांच्या सतर्कतेने मुले पळवणारे संशयित फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 3:45 PM

साकेगाव येथे जि.प.केंद्र शाळेजवळ दोन अनोळखी इसम चॉकलेट देण्याच्या बहाण्याने मुलांना बोलवत असताना मुलाने सतर्कतेने नकार देत आरडाओरड केल्याने मुले पकडणारे संशयित फरार झाले.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांसह पालकांमध्ये दहशतमुलाला चॉकलेट देण्याचा केला होता बहाणाऔषधीसारखे पावडर काढून चॉकलेटवर टाकलेशाळा महामार्गाला लागून असल्याने संशयित लगेच फरारशाळेत पालकांचा गोंधळ

भुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील साकेगाव येथे जि.प.केंद्र शाळेजवळ दोन अनोळखी इसम चॉकलेट देण्याच्या बहाण्याने मुलांना बोलवत असताना मुलाने सतर्कतेने नकार देत आरडाओरड केल्याने मुले पकडणारे संशयित फरार झाले. बुधवारी हा प्रकार घडला.जि.प.उर्दू शाळेतील विद्यार्थी नेहमीप्रमाणे शाळेच्या वेळेवर शाळेच्या प्रांगणावर अर्ध्या तासापूर्वी खेळत होते. त्याच वेळेस दोन अनोळखी व्यक्ती तुटलेल्या इमारती मागे लपून बसले. त्या व्यक्ती इयत्ता चौथीतील विद्यार्थी जीशान अशफाक देशमुख यास चॉकलेटचे आमिष दाखवून बोलवत होत्या. जीशान हा थोडा जवळ गेल्यावर त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या बॅगमधून काढून औषधी सारखे पावडर काढून ते चॉकलेटवर टाकले. त्याच वेळेस जीशान पुढे न जाता, मागे वळू लागला. हे बघून अनोळखी इसमांनी ओरडून परत त्याला बोलावले. मागे वळून पाहिले तर जीशान परत जात असतानाचा राग घेऊन त्यास दमदाटी करत होते. जीशानसोबत हिना देशमुख, आयशा पटेल, मुस्कान पटेल हे विद्यार्थीदेखील खेळत होते.हा प्रकार काही क्षणातच पालकांना समजला व शाळेत पालक क्षणार्धात धावत आले. मुले पकडणाऱ्यांनी आपल्या मुलास नेले तर नाही ना, या भीतीपोटी क्षणार्धात शाळेजवळ मोठी गर्दी जमा झाली. मुलांनी ओरड केल्यानंतर संशयित फरार झाले.शाळेत पालकांचा गोंधळमुलांना पकडणारी गँंग फिरत असल्याची व विकत असल्याची पोस्ट सोशल मीडियावर फिरत असताना त्यातच साकेगावमध्ये दोन अनोळखी इसम चॉकलेटच्या बहाण्याने मुलांना बोलवत असल्याची वार्ता गावामध्ये समजली. परिणामी साकेगावातील इंदिरा गांधी शाळा, जि.प. मराठी व उर्दू शाळा या ठिकाणी पालक पोहोचले व आपल्या मुलांबद्दल शहानिशा केली.शाळा महामार्गाला लागून असल्यामुळे मुले पकडणारे लगेच फरार झाले.जीशान देशमुख हा उर्दू शाळेतील चौथीचा विद्यार्थी असून, शाळा पाऊणेअकराला भरते. या शाळेत दोन शिक्षक असून, मुख्याध्यापक शेख आरिफ हे भुसावळवरून ये-जा करतात, तर शिक्षिका शेहनाज बानो जळगाववरून शाळेत येतात.घटना घडली त्या वेळेस औषधीच्या कामानिमित्त मुख्याध्यापक शेख आरिफ हे वराडसीम येथे औषधी आणण्यासाठी गेले होते, तर ४१ विद्यार्थ्यांसाठी फक्त शिक्षिका शेहनाज बानो ह्या एकट्या शाळेत होत्या.दरम्यान, या घटनेची दिवसभर गावात चर्चा होती. याबाबत पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारची तक्रार देण्यात आलेली नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhusawalभुसावळ