संजय पाटीलअमळनेर, जि. जळगाव : महाराष्ट्राचे आवडते मातृहृदयी सानेगुरुजींचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावेत म्हणून एका ध्येयवेड्या शिक्षकाने स्वत:च्या आवाजात सानेगुरुजींच्या 'श्यामची आई' पुस्तकातील ४२ रात्रींच्या गोष्टी आॅडिओ क्लिप करून सुमारे १०० शाळांना मोफत पाठवून रोज प्रार्थनेच्या वेळी त्या ऐकवल्या जात आहेत.४१ वर्षीय भय्यासाहेब अशोक मगर हे अमळनेर येथे साई इंग्लिश अकॅडमी चालवत असून, अमळनेर ही सानेगुरुजींची कर्मभूमी असून राज्यातील मुलांना मातृहृदयी, मुला फुलांचे कवी, थोर लेखक, समाज सुधारक, स्वातंत्र्य सैनानी, आदर्श शिक्षक कळावेत, सर्वच मुले महाराष्ट्राचे मातृप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र श्यामची आई हे पुस्तक वाचू शकत नाही किंवा एकाचवेळी उपलब्ध होऊ शकत नाहीत. या परिस्थितीवर मार्ग शोधला. जर मुलांना एकाच वेळी आॅडिओ क्लिप ऐकवली तर सवार्ना एकाच वेळी ऐकता येईल आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत गुरुजींचे विचार पोहचविता येतील. म्हणून मगर यांनी स्वखचार्ने ४२ रात्रीच्या कथेचे पुस्तक आॅडिओ क्लिपमध्ये रूपांतर केले आणि एक नव्हे तर तब्बल १०० शाळांना त्या क्लिप मोफत पाठविण्यात आल्या आहेत.अमळनेर तालुक्यातील १५ ते २० शाळांमध्ये, तर नाशिक, पुणे, मुंबई, धुळे, जळगाव, चाळीसगाव, चोपडा, पाचोरा, नगर, उस्मानाबाद, नांदेड, जालना, सटाणा, अमरावती आदी जिल्ह्यात - तालुक्यातील शाळांमध्ये क्लिप पाठवल्या आहेत.विशेष म्हणजे दररोज प्रार्थनेच्या वेळी परिपाठात एक कथा मुलांना या शाळांमधून ऐकवली जात आहे. सानेगुरुजी जयंतीचे औचित्य साधून हा उपक्रम राज्यभरात अनेक ठिकाणी राबवला जात आहे.संस्कारक्षम पिढी घडावी म्हणून गुरुजींचे विचार गावोगावी पोहचविण्याचे स्वस्त, प्रभावी आणि उत्कृष्ट साधन म्हणजे 'श्यामची आई' पुस्तकाची आॅडिओ क्लिप करणे होते. अनेक विद्यार्थी जनरल वाचन करण्याचा कंटाळा करतात म्हणून श्रवणाच्या माध्यमातून गुरुजी त्यांच्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला आहे.-भय्यासाहेब मगर, शिक्षक, अमळनेर
महाराष्ट्रात १०० शाळांमध्ये मुले ऐकताहेत 'श्यामची आई' कथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 2:30 PM
महाराष्ट्राचे आवडते मातृहृदयी सानेगुरुजींचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावेत म्हणून एका ध्येयवेड्या शिक्षकाने स्वत:च्या आवाजात सानेगुरुजींच्या 'श्यामची आई' पुस्तकातील ४२ रात्रींच्या गोष्टी आॅडिओ क्लिप करून सुमारे १०० शाळांना मोफत पाठवून रोज प्रार्थनेच्या वेळी त्या ऐकवल्या जात आहेत.
ठळक मुद्दे संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी सानेगुरुजी जयंतीनिमित्त ध्येयवेड्या शिक्षकाचा मोफत वैचारिक उपक्रम४२ रात्रींच्या 'श्यामची आई' कथेचे पुस्तक आॅडिओ क्लिपमध्ये रूपांतरआॅडिओ क्लिप रोज ऐकवल्या जातात प्रार्थनेच्या वेळी