एरंडोल : दुचाकी का घेऊन गेला याचा जाब विचारत महेंद्र, सागर व चंदू या तिघा भावांनी त्यांचे वडील नंदू रामसिंग जोगी यांच्या डोक्याला काठी मारली व शिवीगाळ केली.रामसिंग यांच्या डोक्याला दुखापत झाली. ही घटना गणेशनगरात बुधवारी घडली.याबाबत एरंडोल पो. स्टे.ला गुन्हा दाखल झाला आहे. हे. कॉ. सुनील लोहार, भीमराव मोरे हे तपास करीत आहेत.
मुलांनी फोडले जन्मदात्याचे डोके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 3:36 PM