फैजपूर, जि.जळगाव : लोहारा, तारावेर. येथील लोकसेवक मधुकरराव चौधरी माध्यमिक आश्रमशाळेत शुक्रवार, दि.२२ नोव्हेंबरपासून दोन दिवसीय विज्ञान बालमेळावा आयोजित केला आहे.कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, सिलेज बेस्ड एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम, विज्ञान प्रसार नवी दिल्ली व धनाजी नाना महाविद्यालय यांच्या वतीने हा मेळावा होईल, अशी माहिती प्राचार्य प्रा. पी.आर. चौधरी यांनी दिली.या मेळाव्यात आठवी ते दहावीचे अनुसूचित जमातीचे शंभरावर विद्यार्थी सहभागी होतील. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी व संशोधनाची आवड निर्माण व्हावी यासाठी हा मेळावा आयोजित केला आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. पी.पी.पाटील उद्घाटन करतील. आमदार शिरीष चौधरी अध्यक्षस्थानी असतील. राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील, राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान केंद्र मुंबईचे सल्लागार डॉ.अजित पाटणकर व समन्वयक डॉ.सुभाष बेंद्रे, सातपुडा विकास मंडळ पालचे सचिव अजित पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य दीपक पाटील, नितीन बारी व लोकसेवक मधुकरराव चौधरी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.आर पाटील हे विशेष अतिथी असतीलशनिवारी २३ रोजी या मेळाव्याचा समारोप प्रा.सुभाष बेंद्रे यांच्या उपस्थितीत होईल. अध्यक्षस्थानी अजित पाटील असतील. डॉ. एच.एल.तिडके, उपप्राचार्य अनिल सरोदे, डॉ.सतीश चौधरी, मुख्याध्यापक सुधाकर झोपे संयोजन करीत आहेत. नितीन सपकाळे, जितेंद्र पाटील, भरत पाटील, ललित पाटील , चेतन इंगळे सहकार्य करीत आहेत.
रावेर तालुक्यातील लोहारा येथे शुक्रवारपासून विज्ञान बालविज्ञान मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 8:04 PM
लोहारा, तारावेर. येथील माध्यमिक आश्रमशाळेत २२ नोव्हेंबरपासून विज्ञान बालमेळावा आयोजित केला आहे.
ठळक मुद्देदोन दिवसीय मेळाव्यात शंभरावर विद्यार्थ्यांचा सहभागविद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी हा मेळावा