ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.2 : शेतक:यांनी पुकारलेल्या संपाच्या दुस:या दिवशी भाजीपाल्याच्या आवकवर मोठा परिणाम होऊन शुक्रवारी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ 25 ते 30 टक्केच भाजीपाला आला. मालाची आवक कमी झाल्याने भाव गगणाला भिडू लागले असून 10 रुपये प्रति किलो असणारे लाल टमाटय़ाचे भाव सहापटीने वाढून ते 60 रुपये किलोवर पोहचले. हिरवी मिरचीदेखील 70 ते 80 रुपये किलोवर पोहचली आहे. दरम्यान, शहरात येणा:या दुधाच्या पुरवठय़ावरही परिणाम होऊन हा पुरवठा निम्मावर आला आहे.
आवक घटल्याने भाव वधारले
संपाच्या पहिल्या दिवशी 60 टक्के आवक होती. त्या तुलनेत दुस:या दिवशी आवक निम्म्यावर आली. त्यामुळे बाजार समितीपासून भाववाढ होण्यास सुरुवात झाली. दररोजच्या लिलावापेक्षा 10 टक्क्याने भाव वाढ झाल्याचे सांगण्यात आले. किरकोळ बाजारात तर शुक्रवारी भावाचा भडका होऊन लाल टमाटय़ाचे भाव सहापटीने वाढले. संपापूर्वी 10 रुपये किलो असणारे टमाटे संपाच्या पहिल्या दिवशी 15 रुपये किलोवर पोहचले होते. दुस:याच दिवशी ते थेट 60 रुपये किलो झाले. पाव किलोचा भाव तर 20 रुपयांच्या खाली आला नाही. या सोबतच हिरवी मिरचीदेखील झोंबू लागली असून ती 70 ते 80 रुपये किलोवर पोहचली आहे.
इतर भाज्यांच्या भावातही वाढ झाली असून भेंडी 70 रुपये किलो, कारले 70 रुपये किलो, कोथिंबीर 60 रुपये किलो, कैरी 70 रुपये किलो, वांगे - 50 ते 60 रुपये किलोवर पोहचले आहे. 10 रुपये किलो विक्री होणारा बटाटाही 15 रुपये किलो झाला आहे.
मालाची आवकच नसल्याने वाढीव भावाने माल खरेदी करावा लागत आहे, त्यामुळे भाव वधारले असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.