जळगाव : बाप्पाचे शुक्रवारी मोठ्या भक्तीमय वातावरणात घराघरात आगमन होणार आहे़ त्यापूर्वी शाळांमध्ये गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा पार पडली. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी दिलेल्या प्रशिक्षणानंतर गणरायाची मूर्ती साकारली. त्यानंतर या मूर्तीची विद्यार्थ्यांकडून शुक्रवारी स्थापना होणार आहे.
गणराचे विद्यार्थ्यांनी रखाटले चित्र (१० सीटीआर ८२ )
शुक्रवारपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. या उत्साहात सर्वच आनंदाने सामील होत असतात. याच पार्श्वभूमीवर प्रगती विद्यामंदिर शाळेचे शिक्षक मनोज भालेराव यांनी 'शाळा बंद पण शिक्षण सुरु' या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या कौशल्यचा विकास व्हावा व त्यांच्या अंगी असलेल्या कला गुणांना वाव मिळावा हा उद्देश ठेवून चित्र काढून रंगविणे स्पर्धेचे आयोजन केले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत गणरायाची अतिशय सुंदर चित्रे काढून रंगविली. स्पर्धेप्रसंगी विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रेमचंद ओसवाल यांनी मार्गदर्शन केले.
०००००००००
विद्यार्थ्यांनी घडविलीे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती (१० सीटीआर ७९)
हरिविठ्ठलनगरातील जिजामाता माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय हरित सेना उपक्रमांतर्गत शाडू मातीची गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी शैलेजा मिस्त्री यांनी ऑनलाइन प्रशिक्षण देवून गणेश मूर्ती विद्यार्थ्यांकडून बनवून घेतल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांनी चित्रकला शिक्षक दिनेश सोनवणे यांच्या मदतीने मूर्तींना पर्यावरणपूरक रंग देण्याचे कौशल्य जाणून घेतले व मूर्तीचे घराघरात आराधना केली. या कार्यशाळेस मुख्याध्यापक राजेंद्र खोरखेडे यांनी मार्गदर्शन केले तर यशस्वीतेसाठी हरित सेना शिक्षक किशोर पाटील यांनी प्लास्टर ऑफ पॅरिसपासून पाण्यातील जैवविविधता कशी नष्ट होते हे विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी शिक्षक संजय खैरनार, कृष्णा महाले,आशा पाटील, संगीता पाटील आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले.
००००००००
गणरायाची होणार स्थापना
भा.का.लाठी, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, आऱआऱ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी सकाळी ९ वाजता गणेशाची स्थापन ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अरविंद लाठी व सरला लाठी यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. यावेळी गजमल नाईक, योगेश चौधरी, परेश श्रावगी, सोनाली रेंभोटकर यांच्यासह शिक्षकांची उपस्थिती असेल.
००००००००००
घरीच साकारली मूर्ती
विवेकानंद प्रतिष्ठानचा इयत्ता तिसरीचा विद्यार्थी इशांत विजय आंबेकर याने घरी आजी-आजोबा व शिक्षकांच्या मार्गदर्शनातून गणरायाची मूर्ती साकारली. तर तिला रंग देवून शुक्रवारी स्थापना करणार आहे. तसेच इतरांनी घरी गणेश मूर्ती बनवून तिची स्थापना करावी, असा संदेशही तो देत आहे. दुसरीकडे नंदिनीबाई विद्यालयाची इयत्ता अकरावीची विद्यार्थिनी प्रणिता यशवंत शिंपी हिनेही शाडू मातीची श्रीची गणपती घडविली.