शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडक्या बहिणींना वर्षाला देणार २५००० ; अजित पवारांची घोषणा, जाहीरनाम्यात काय काय?
2
"सत्ता गेली, तर कुत्र पण विचारणार नाही", मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांनी फटकारलं
3
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या ग्रामीण भागात 'सुपरहिट'; कमला हॅरिस यांचे प्रयत्न कमी पडल्याची चिन्हे
4
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; तुमच्याकडे कारचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर...
5
रुपाली भोसलेने Bigg Boss मधील 'या' स्पर्धकाची केली कानउघाडणी; म्हणाली, "का हा ॲटिट्युड?"
6
कंगना रणौतचा डोनाल्ड ट्रम्प यांना सपोर्ट, म्हणाली- "मी अमेरिकन असती तर..."
7
Sunita Williams : सुनीता विलियम्स यांच्यासह नासाच्या ३ अंतराळवीरांनी केलं मतदान; स्पेसमधून कसं दिलं जातं मत?
8
"आम्ही मुंब्राच काय, पाकिस्तानात शिवरायांचं मंदिर उभारू", संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर
9
सांगोल्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत फूट; ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा की शेकापला साथ?
10
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
11
IPL मेगा लिलावात उतरलाय कोच; त्याच्यावर बोली लावत CSK 'सुपर कॉम्बो'चा डाव साधणार? की...
12
Tulsi Vivah 2024 यंदा तुळशीचे लग्न कधी? ‘अशी’ सुरु झाली परंपरा; पाहा, मान्यता अन् महत्त्व
13
Bank Locker Charges : 'या' सरकारी बँकांनी वाढवले बँक लॉकर चार्जेस; आता किती द्यावे लागतील पैसे; तुमचा लॉकर आहे का?
14
मराठमोळी अभिनेत्री दीप्ती देवीचं घटस्फोटावर पहिल्यांदाच भाष्य; म्हणाली, "आजही माझं त्यांच्यावर..."
15
"ना शिवरायांनी सांगितलं, ना बाबासाहेबांनी सांगितलं, हे आत्ता सुरू झालं, कारण..."; 'संत' म्हणत राज यांचा पवारांवर हल्लाबोल
16
"माझा राजकीय अस्त करण्याची व्यूहरचना"; पंकजा मुंडेंच्या पराभवाचा उल्लेख, धनंजय मुंडे काय बोलले?
17
मंगलदेशा, पवित्रदेशा, नातेवाइकांच्याही देशा..., कुटुंबकबिल्याच्या विळख्यात महाराष्ट्राचं राजकारण
18
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
19
वृश्चिक संक्रांती: ७ राशींना लाभच लाभ, सरकारी नोकरीचे योग; उत्पन्नात वाढ, पैशांची बचत शक्य!
20
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!

चाळीसगाव महाविद्यालयाने साकारला सौरऊर्जा प्रकल्प मॉडेल प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 8:15 PM

बी.पी.आर्टस, एस.एम.ए.सायन्स, के.के.सी.कॉमर्स कॉलेज आणि के.आर. कोतकर ज्युनियर कॉलेजमध्ये १० केव्हीए क्षमतेच्या सोलर ऊर्जा प्रकल्पाचा उद्घाटन समारंभ नुकताच खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते झाले.

ठळक मुद्देखासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते झाले उद्घाटनचाळीसगाव पंचक्रोशीत महाविद्यालय स्तरावर पहिला प्रकल्प१० केव्हीए क्षमतामान्यवरांकडून कौतुक

चाळीसगाव, जि.जळगाव :- बी.पी.आर्टस, एस.एम.ए.सायन्स, के.के.सी.कॉमर्स कॉलेज आणि के.आर. कोतकर ज्युनियर कॉलेजमध्ये १० केव्हीए क्षमतेच्या सोलर ऊर्जा प्रकल्पाचा उद्घाटन समारंभ नुकताच खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संस्थेच्या मॅनेजिंंग बोर्डाचे चेअरमन नारायणदास अग्रवाल होते.उमंग समाज शिल्पी परीवाराच्या अध्यक्षा संपदा पाटील, उपाध्यक्ष मिलिंद देशमुख, डॉ. एम. बी.पाटील, श्यामलाल कुमावत, क. मा. राजपूत, मु. रा. अमृतकार, डॉ. सुनील राजपूत, भाजपा तालुकाध्यक्ष के. बी. साळुंखे, ज.मो. अग्रवाल, योगेश अग्रवाल, अशोक बाबूलाल वाणी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रास्तविक प्राचार्य डॉ मिलिंद बिल्दीकर यांनी केले.चाळीसगाव महाविद्यालयाने अपारंपरिक ऊर्जा श्रोताचा वापर करण्यासाठी सौर प्रकल्पची उभारणी केली. ही बाब खरोखर समाजापुढे आदर्श निर्माण करणारी आहे. अपारंपरिक ऊर्जा श्रोतांच्या माध्यमातून घरोघरी उर्जा निमीर्ती केली जाऊ शकते व त्यातून अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकतात. ग्रामीण भागातील विद्यार्थां नोकरीच्या मागे न जाता रोजगार निर्माती करू शकतो. तसेच महाविद्यालयाने व्यावसायिक अभ्यासक्रमांवर भर देऊन तरुणांना रोजगाराभिमुख करावे. तालुक्यातील इतर शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना हा प्रकल्प आवर्जून दाखवावा. त्यांना या संदर्भात समजून सांगावे. जेणेकरून ग्रामीण भागात सौर ऊर्जेचे महत्व समजेल. महाविद्यालयास डॉ.मिलिंद बिल्दीकर यांच्या रूपाने संगणक , माहीती व तंत्रज्ञाना क्षेत्राशी निगडीत व अभ्यासू प्राचार्य मिळाले. त्यामुळे नारायणदास अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाची व पर्यायाने संस्थेची प्रगती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाविद्यालयाच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्वतोपरी मदतीचे आश्वासनही पाटील यांनी यावेळी दिले. उन्मेष पाटील हे जळगाव लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला.संपदा पाटील, के. बी. साळुंखे संचालक योगेश अग्रवाल यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतात नारायणदास अग्रवाल म्हणाले की, गेल्या काही वर्षांमध्ये, विजेचे दर कमालीचे वाढले आहेत. सौरऊर्जा निर्माण केल्यास आपल्या विजेच्या बिलात बचत होईल. आपल्या संस्थेचा माजी विद्यार्थी खासदार झाल्याचा खूप आनंद झाला. सूत्रसंचालन प्रा. रवींद्र पाटील यांनी, तर आभार उपप्राचार्य अजय काटे यांनी मानले.