कु:हा-काकोडा : वढोदा वनक्षेत्रातील डोलारखेडा परिमंडळामार्फत येणा:या सुकळी नियतक्षेत्रात शिका:यांनी साळींदर (सायल) प्राण्याची शिकार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून त्यामुळे वन्यजीव प्रेमींमध्ये कमालीची नाराजी आहे. अवैध शिका:यांचा राबता वाढल्यामुळे या जंगलातील वन्यप्राण्यांचा अधिवास धोक्यात आल्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पट्टेदार वाघाच्या अधिवासासाठी पोषक असलेल्या डोलारखेडा परिमंडळात सुमारे आठवडाभरापूर्वी ही घटना घडली. सुकळी नियतक्षेत्रातील वनखंड 540 मध्ये अज्ञात शेतक:यांनी ही शिकार केली असून जमिनीत खोलवर भुयार करून राहणा:या प्राण्यास जमिनीबाहेर काढण्यासाठी या ठिकाणी सुमारे सहा फुटांचे सहा खड्डे खोदण्यात आले आहेत. याच खड्डय़ांच्या माध्यमातून भुयारात कळपाने राहणा:या साळींदरांना या शिका:यांनी ठार मारले असल्याचे बोलले जात आहे. याच ठिकाणी साळींदारांच्या अंगावरील काटय़ांचा ढीग पडलेला होता. यावरून शिका:यांनी शिकार करून त्यांचे काटे येथेच टाकल्याचे बोलले जात आहे. घटनेसंदर्भात समजताच वनक्षेत्रपाल बी.बी. जोमीवाले यांनी चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार वनपाल विजय फणसे, वनरक्षक डी.एस.पवार, वनमजूर संजय सांगळकर यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. या वेळी त्यांना साळींदरांचे काटे आढळून आले. तसेच घटनास्थळी काहीतरी जाळल्याच्या खुणा सापडल्या. खड्डे खोदण्याआधी शिका:यांनी आजूबाजूच्या वृक्षांची मोठय़ा प्रमाणात कत्तल केली. मात्र याबाबत वनविभागात कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे समजते. वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात डोलारखेडा परिमंडळात याआधी पट्टेदार वाघीण मृतावस्थेत आढळली होती. त्यावरून वनविभागाचा निष्काळजीपणा चव्हाटय़ावर आला होता. त्यानंतर हरणांचा कुजलेला अवस्थेतील सांगाडा सापडला होता. आता साळींदरची शिकार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या तिन्ही घटनेतील साम्य म्हणजे घटना घडून आठवडा उलटल्यानंतरसुद्धा वनविभागाला त्याचा थांगपत्ता नव्हता. सजग नागरिकांनी सांगितल्यावर व ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतच वनविभागाला जाग आली होती. अशा प्रकारामुळे खरंच वन्यजीव सुरक्षित आहेत काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिका:यांची टोळीच सक्रि य साळींदरची शिकार करणे अतिशय कठीण काम असते. भुयारी खड्डे खोदण्यासाठी लागणारा वेळ, मेहनत व धाडस याचा विचार करता हे अट्टल शिका:यांच्या टोळीचे काम असल्याचे स्पष्ट होते. कॅमेरे धुळखात वन्यप्राण्यांच्या हालचाली टिपण्यासाठी व वनगुन्हेगारीला आळा घालण्यासाठी वनविभागाकडे असलेले ट्रॅप कॅमेरे अपूर्ण मनुष्यबळामुळे कार्यालयातच धुळखात पडल्याचे समजते. त्यासाठी लागणा:या मजुरीचे पैसे नसल्याचे सांगण्यात येते. वनरक्षकाचा अतिरिक्त पदभार वाघाचा राबता असलेल्या दक्षिण डोलारखेडा नियतक्षेत्रात वनक्षेत्राचे पद वर्षभरापासून रिक्त असून अतिरिक्त पदभारावर जंगलाचे संरक्षण अवलंबून आहे. याचाच फायदा गुन्हेगार उचलत आहे.(वार्ताहर)सुमारे दहा ते बारा दिवसांपूर्वी सदर घटना घडली असून त्याबाबत वनपालांना चौकशीचे आदेश दिले आहेत. पंचनामा झाला आहे. साळींदराचे काटे सापडले, मात्र उलट अवयव घटनास्थळी आढळले नाही. स्थानिकांनीच हा प्रकार केला असल्याचा अंदाज आहे.- बी.बी. जोमीवाले, वनक्षेत्रपाल वढोदा,ता.मुक्ताईनगर,जि.जळगाव
सुकळी जंगलात साळींदरची शिकार
By admin | Published: March 16, 2017 12:09 AM