धरणगाव : तालुक्यातील पिंप्री येथील अंजनी पुलावर मोटारसायकल लावून त्याला आपली कागदपत्रांची बॅग अडकवून बेपत्ता झालेल्या चोपडा बस डेपोतील वाहतूक निरीक्षक व्ही.डी.सोनवणे यांनी नदीत उडी घेवून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले असून त्यांचे प्रेत १६ रोजी पहाटे पाण्यात तरंगतांना आढळले. १५ रोजी पोलिसांनी चार तास अंजनी नदी पात्रातील पाण्यात शोध घेतला होता. मात्र नदीतील गाळामध्ये ते फसले असल्याने सापडले नव्हते.मूळचे डांभूर्णी ता.यावल येथील रहिवासी असलेले व्ही.डी.सोनवणे (ह.मु.बोरोलेनगर, चोपडा) हे एस.टी.परिवहन मंडळाच्या चोपडा डेपोत वाहतूक निरीक्षक म्हणून कार्यरत होते. दि. १५ सप्टेंबरच्या पहाटे त्यांची नंबर प्लेटवर ‘बेटी बचाव’ लिहिलेली आणि बॅग टांगलेली मोटारसायकल पिंप्री येथील अंजनी नदीच्या पुलावर बेवारस अवस्थेत आढळल्याने सदर इसमाने नदीपात्रात आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा अंदाज होता. त्यामुळे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, हे. कॉ. मोती पवार आणि सहकाºयांनी नदीपात्रात पाच/सहा मजूरांना उतरवून तब्बल तीन/चार तास शोधाशोध केली. परंतु ते सापडले नव्हते.प्रेत तरंगतांना आढळले...दरम्यान, १६ रोजी सकाळी मॉर्निंग वॉक करण्यासाठी गेलेल्या पिंप्रीच्या काही लोकांना एका माणसाचे प्रेत तरंगतांना दिसले. तेव्हा त्यांनी धरणगाव पोलीस स्टेशनला या संदर्भात कळविले. पोलिसांनी तातडीने शव बाहेर काढून नातेवाईकांना बोलावून त्यांची ओळख पटवली. ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन करण्यात आल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात शव देण्यात आले. व्ही.डी.सोनवणे हे एस.टी. महामंडळात वाहतूक निरीक्षक होते. तसेच एलआयसी एजंटचे कामदेखील करीत होते. झोन मध्ये त्यांचे काम अव्वल असल्याने एलआयसीतर्फे ते अमेरिका टूर देखील करून आले होते. दरम्यान, त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. धरणगाव पोलीसात या घटनेसंदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो.नि.चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे. कॉ. मोती पवार करीत आहेत. मयत व्ही.डी.सोनवणे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्यावर डांभुर्णी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
चोपड्याच्या वाहतूक निरीक्षकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 1:52 AM
चोपडा एस. टी. बस डेपोचे वाहतूक निरीक्षक व्ही. डी. सोनवणे यांचे दुसऱ्या दिवशी प्रेत आढळून आले असून त्यांनी आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.
ठळक मुद्देअंजनी नदीच्या पुलावर दुचाकी उभी करून घेतली पाण्यात उडीसोनवणे मूळचे डांभुर्णी ता. यावल येथील रहिवासी.