चोपडा : कला, शास्त्र व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी स्वरांगी वसंतराव अहिरे ही १२ वी परीक्षेत विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवगार्तून नाशिक विभागातून प्रथम आली होती. या यशाबद्दल तिचा राज्यमंत्री मदन येरावार यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला.५१ हजार रुपये रोख, प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह असे या सन्मानाचे स्वरुप होते. मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहात नुकताच हा कार्यक्रम झाला.याबद्दल स्वरांगीचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश जी. पाटील, अध्यक्ष अॅड.संदीप पाटील , उपाध्यक्षा आशा विजय पाटील, सचिव डॉ.स्मिता पाटील, प्राचार्य डॉ. डी.ए. सुर्यवंशी, उपप्राचार्य प्रा.बी.एस. हळपे, पर्यवेक्षक प्रा. व्ही.वाय. पाटील व शिक्षक यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
चोपड्याची स्वरांगी अहिरे नाईक पुरस्काराने सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 6:07 PM
कला, शास्त्र व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी स्वरांगी वसंतराव अहिरे ही १२ वी परीक्षेत विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवगार्तून नाशिक विभागातून प्रथम आली होती.
ठळक मुद्देचोपडा येथील कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थीनीस्वरांगी अहिरे नाशिक विभागातून प्रथमराज्यमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते सन्मान