आॅनलाईन लोकमतचोपडा,दि.४ : यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट, वंदे मातरम मित्र परिवार व डॉ.राहूल पाटील मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन वर्षानिमित्त १ जानेवारी रोजी रक्तदान, रक्तगट तपासणी आणि देहदान व अवयदान शिबीर घेण्यात आले. शिबिरात १०९ तरुणांनी रक्तदान केले तर ४०० महाविद्यालयीन युवक, युवतींनी रक्तगट तपासणी केली. प्रताप विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षिका नलिनी देशमुख यांचेसह ३५ जणांनी देहदान व अवयदानाचा संकल्प करून नोंदणी केली.रक्तदान शिबिराचे उद्घाटन भाजपाचे ज्येष्ठ नेते घनश्याम अग्रवाल यांच्या हस्ते तर रक्तगट तपासणी व अवयदान शिबिराचे उद्घाटन तहसीलदार दीपक गिरासे यांच्याहस्ते झाले. शिबिरात रक्तदान करणारे शाखा अभियंता किरण पाटील व वसुधा पाटील या दाम्पत्याचा नगराध्यक्षा मनीषा चौधरी व नगरसेवक जीवन चौधरी यांच्याहस्ते सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रताप विद्या मंदिर शाळेतील सेवानिवृत्त शिक्षिका नलिनी देशमुख यांनी देहदान करण्याचा संकल्प करून नोंदणी केली त्याबद्दल त्यांचा डॉ.राहुल पाटील, कांतिलाल पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ.आर. सी.गुजराथी, डॉ.प्रेमचंद महाजन, नगरसेवक डॉ.रवींद्र पाटील, डॉ.नरेंद्र पाटील, डॉ.भरत पाटील, डॉ. हेमंत पाटील, डॉ.प्रशांत पाटील, डॉ.जे.डी. चव्हाण, डॉ.एल.टी.पाटील, डॉ.सादिक मलिक, डॉ.निशांत सैय्यद, डॉ.फारूक सैय्यद, डॉ. नदिम शेख, डॉ नवाज, डॉ.देवेंद्र भदाणे, डॉ शाम पाटील, डॉ रामेश्वर पाटील, डॉ.कांतीलाल पाटील, डॉ.ए.के.पाटील, डॉ.वंदना पाटील, डॉ तृप्ती पाटील, विश्वनाथ अग्रवाल, कवी अशोक सोनवणे, रोटरी क्लबचे अध्यक्ष विलास पाटील, राजेंद्र पाटील तांदलवाडी, तावसे येथील लोकनियुक्त सरपंच कमल चौधरी, ज्ञानेश्वर पाटील, चोसाका व्हा.चेअरमन शशी देवरे, शशी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वीतेसाठी वंदे मातरम मित्र परिवार व वंदे मातरम क्रिकेट क्लबचे जुगल पाटील, दिलीप पाटील, निवृत्ती पाटील, सुनील पाटील, कांतीलाल पाटील, शत्रुघ्न पाटील, विजय पाटील, जितेंद्र पाटील, भरत पाटील, नरेंद्र पाटील, भगवान पाटील, अविनाश माळी, प्रदीप पाटील, दिनेश नाथबुवा, रोहिदास पावरा, सुनील पाटील, विलास पाटील, संदीप पाटील यांनी परिश्रम घेतले.
चोपड्यात १०९ तरुणांनी केले रक्तदान तर ३५ जणांचा देहदान व अवयदानाचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 4:24 PM
चोपडा येथील वंदे मातरम मित्र परिवार व यशोधन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे शिबिराचे आयोजन
ठळक मुद्देवंदे मातरम् मित्र परिवारातर्फे रक्तदान शिबिरासह विविध सामाजिक कार्यक्रमांचे चार वर्षांपासून आयोजन१०९ तरुणांचे रक्तदान तर ४०० महाविद्यालयीन युवक, युवतींचा रक्तगट तपासणी३५ जणांनी केला देहदान व अवयदानाचा संकल्प