महाराष्ट्र राज्य सामाजिक व पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्याध्यक्ष वनमित्र आबासाहेब मोरे, राज्य समन्वयक नाना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पर्यावरण समिती जळगाव जिल्हाध्यक्षा नयना पाटील व कार्याध्यक्षा मनिषा पाटील यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली, तर उर्वरित तालुका कार्यकारिणी अध्यक्ष सविता सोनवणे यांनी जाहीर केली.
उपाध्यक्ष दीपाली नितीन बाऊस्कर, कार्याध्यक्ष सरोज पाटील, सचिव शैला पाटील, सहसचिव दिशा भूषण सोनवणे, कोषाध्यक्ष क्रांती दिनेश सदाशिव, सहकोषाध्यक्ष चेतना चारुदत्त बडगुजर, संघटक जयश्री राहुल बारी, सहसंघटक कल्पना संजय बारी, कायदेशीर सल्लागार अलका अजय बारी, तज्ज्ञ मार्गदर्शक योगिता राकेश पाटील, सल्लागार सदस्य विद्या रमण पाटील, कार्यकारणी सदस्य स्नेहा दीपक दीक्षित, महाविद्यालयीन प्रमुख दीपाली माळी, दीपिका पाटील.
याप्रमाणे, कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. झाडे लावणे, आयुर्वेदिक रोपांची बाग, पशुपक्ष्यांसाठी कार्य, योग प्राणायाम कार्य आदी उपक्रम राबविण्याचा मानस समिती अध्यक्ष सविता सोनवणे, उपाध्यक्ष दीपाली बाउस्कर आणि सचिव शैला पाटील यांनी व्यक्त केला आहे.