चोपडा,दि.8- व:हाड पिंपळनेर (ता.साक्री) येथे नेण्यासाठी चोपडा आगारातरर्फे चक्क नादुरूस्त व खराब बस देण्यात आल्या. आगारात कोणीच थारा देत नसल्याने, व:हाडीचा संताप झाला. त्यामुळे व:हाड घेऊन जाण्यास तब्बल तीन तास उशिर झाला. याप्रकारामुळे एस.टी. महामंडळाचा भोंगळ कारभार समोर आला.चोपडा येथील अरूणोदय कॉलनीतील कमलबाई चौधरी यांचा मुलगा स्वप्नील चौधरी याचा विवाह मुल्हेर (ता. सटाणा) येथील भगवान शंकर सूर्यवंशी यांची कन्या गायत्री हिच्याशी 8 रोजी पिंपळनेर येथे दुपारी 12.35 ला होणार होता. त्यासाठी चौधरी यांनी व:हाड घेऊन जाण्यासाठी चोपडा आगारात तीन बसेस बुक केल्या होते. हे व:हाड पहाटे 4 वाजता चोपडय़ाहून निघणार होते. मात्र महामंडळातर्फे देण्यात आलेल्या बसपैकी एमएच 20 बीएल 2418 याबसचे पाच पाटे तुटलेले होते. तर एमएच 40 एन. 9864 या क्रमांकाची बस घासली असल्याने चालक घेऊन जाण्यास तयार नव्हता. अशाही परिस्थितीत चालकांना बसेस घेऊन जाण्यास सांगण्यात आले. मात्र अपघाताच्या भीतीने त्यांनी बसेस आगारातच उभ्या केल्या. नवीन बसेस घेण्यात अर्धा ते पाऊण तासांचा वेळ गेला . त्यातच बसेस देणारे विकास बारी हे आगारात आले. बसेस खराब देण्याच्या कारणावरून चालक आणि बारी यांच्यात तू तू मै मै झाली. आगारात व:हाडींना थारा देण्यासाठी कोणीही जबाबदारी अधिकारी नसल्याने, व:हाडींचाही पारा चढला होता. अखेर बस मिळाल्यानंतर सकाळी सव्वासात वाजता व:हाड पिंपळनेरकडे रवाना झाला. एस.टी.च्या भोंगळ कारभारामुळे व:हाडींना मात्र मनस्ताप सहन करावा लागला.
चोपडा आगाराकडून नादुरूस्त बस दिल्याने व:हाडाला तीन तास उशिर
By admin | Published: May 08, 2017 12:20 PM