शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

चोपडा, भडगाव तालुक्यात पिकांचे कोट्यवधीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 8:45 PM

अवकाळी वादळी पावसाने हानी : शेतकरी अडचणीत, भरपाई मिळण्याची मागणी

चोपडा/ भडगाव : रविवारी रात्री झालेल्या वादळी पावसाने चोपडा तालुक्यात प्रचंड नुकसान झाले असून त्या खालोखाल भडगाव तालुक्यातला फटका बसला आहे. चोपडा तालुक्यात केळीचे अधिक नुकसान झाले असून सुमारे ८ ते १० आदिवासींच्या घरांचे छप्पर उडाल्याने त्यांचा संसार उघड्यार आला आहे. तर भडगाव तालुक्यात केळी, आंबा व लिंबू यांना फटका बसला आहे. ऐन दुष्काळात कोट्यवधीचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.चोपडा तालुक्यातकेळीचे मोठे नुकसानचोपडा तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये रविवारी १४ रोजी दुपारी सुमारे एक तास जोरदार वादळी अवकाळी पावसाने झोडपून काढले. त्यात केळी पीक आडवे होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वादळाचे केंद्रबिंदू यावेळी चहार्डी असल्याने मोठा फटका चहार्डी भागात बसला आहे. लासुर,आडगाव आणि बिडगाव,शेवरे या गावांमध्ये अर्धा ते पाऊण तास जोरदार पाऊस झाला. वादळामुळे एकूण २९० शेतकरी बाधीत झाल्याचीमाहिती तहसीलदार अनिल गावित व नायब तसहीलदार अधिकार पेंढारकर यांनी दिली. वादळात वाऱ्याचा वेग प्रतितास १३ ते ३७ किलोमीटर असल्याने या वादळात अनेक केळी बागा आडव्या झाल्या आहेत. तर काही ठिकाणी विजेचे खांब व वृक्षही कोसळले. शेवरे येथे अनेक घरांवरील छप्परही उडून गेल्याने अनेकांचा संसार उघड्यावर आला. तसेच शेतशिवारातील जेमतेम असलेला गुरांसाठीचा मका व गव्हाचा चाराही खराब झाला. काही ठिकाणी वृक्षही उन्मळले.वादळ अकुलखेडा मार्गे चहार्डीकडे आले. त्यात चहार्डी परिसरात असलेली केळी आडवी झाली. तसेच इतर पिके गहू,दादर,कांदा, मका यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.चहार्डी येथे मिलिंद भास्करराव शहा यांच्या शेतातील जवळपास ४०० केळीचे झाडे आडवे झाले त्यांचे जवळपास ६० हजार रुपयांचे नुकसान झाले,तर सुहालाल शिवाजी पाटील यांच्या शेतातील केळीचे १००० केळीचे झाडे आडवी झाले त्यात त्यांचे जवळपास दीड लाखाचे नुकसान झाले.डॉ. संजीव शामराव पाटील यांच्या शेतातील २०० केळीचे झाडे तर जी. टी. पाटील यांच्या शेतातील २०० केळीचे झाडे आणि बंडू चौधरी यांच्या शेतातील १०० केळीचे झाडे व प्रशांत जगन्नाथ पाटील यांच्या शेतातील १५० केळीचे झाडे उन्मळून पडल्याने प्रत्येकी हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. अडावद परिसरातही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.बिडगाव परिसरात१६ तास ‘बत्ती गुल’सातपुडा पर्वतातील कुड्यापाणी, शेवर,े बिडगाव, वरगव्हान परिसरात १४ रोजी दुपारी साडेतीनच्या दरम्यान वादळी वाºयासह जोरदार पावसाने अनेक शेतकºयांची केळीची झाडे जमीनदोस्त होवून नुकसान झाले. वृक्षही उन्मळ होते.तर विजेचे खांब कोसळुन सुमारे १५गावांचा बंद पडलेला विजपुरवठा तब्बल सोळा तासांनी पुर्ववत झाला. यामुळे जनजीवन विस्कळीत होऊन पाण्यासाठी चांगलीच भटकंती झाली.बिडगाव येथील दशरथ पाटील, प्रताप पाटील भालोदकर यांचे तर वरगव्हान येथील पोलीस पाटील गोरख पाटील, हुकूमचंद पाटील आदी शेतकºयांची केळी जमीनदोस्त होऊन मोठे नुकसान झाले आहे. तर शेवरे येथे वादळात सुभान पावरा यांच्यासह सात ते आठ नागरिकांच्या घरांचे छते उडून नुकसान झाले होते. ते दुरूस्तीचे काम हे बाधीत ग्रामस्थ करीत होते.दिवसभर ढगाळ वातावरणदरम्यान १५ रोजी सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने उन्हाची तीव्रता कमी झाली आहे.तापमान खाली आहे. तसेच चोपडा शहरासह अनेक भागात वादळात तारांचा एकमेकांना स्पर्श झाल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता.पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते. दुपारी एक वाजेनंतर वीज पुरवठा सुरळीत झाला.भडगाव तालुक्यातआंबा, लिंबू बागांना फटकाभडगाव- शहरासह तालुक्यात १४ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास अवकाळी तुरळक पाऊसासह वादळी वाºयाने आंबा, लिंबू बागांचे आतोनात नुकसान झाले. ज्वारी, बाजरी, कांदे आदी पिकांचेही नुकसान झाले आहे. केळी झाडाची पाने फाटून या पिकालाही फटका बसला आहे.तालुक्यात बहुतांश भागात अशाप्रकारे पिकांचे नुकसान झाले आहे. सध्या ज्वारी, बाजरी कापणी, खुडणी, काढणीचा शेवटचा हंगामा आहे. दुष्काळी स्थितीचा फटका बसल्याने थोडफार हंगाम होता त्यावर निसर्गाने नुकसानीचा जणू नांगरच फिरविला आहे.याआधी पाण्याअभावी ज्वारी, बाजरी, केळी, मोसंबी आदी पिके वाळून शेतकºयांची नुकसान झाले आहे. तर यावर्षी आंबा चांगला बहरला होता. मात्र दुष्काळी स्थितीचा फटका बसल्याने कैरी बारीक पडली. शेतकºयांना आंबा उत्पन्नाची मोठी आशा होती. व्यापाºयांनीही जामदा उजवा व डावा कालव्यांलगत बांधावरील झाडे, आमरायांचा हजारो रुपयांनी सौदा केलेला होता. मात्र अवकाळी पाऊस व वादळाने झाडावरील कैरीचा सडा पडून मोठे नुकसान झाले आहे. अर्ध्याच्यावर आंब्याचे नुकसान झाल्याचे शेतकरी, व्यापाºयांनी सांगितले. वादळाने शहरासह तालुक्यात वीज पुरवठा देखिल खंडित झाला होता.यावर्षी सर्वत्र दुष्काळाचे सावट असले तरी गुढे परिसरात गिरणेच्या कृपेने गुढे, बहाळ, कोळगाव, घुसर्डी, गोंडगाव, खेडगाव मध्ये थोडे फार बागायती क्षेत्र असून या क्षेत्रात लिंबू ,केळी, ऊस, मोसंबी, आणि आंबा अशीे फळबाग आहे. फळबाग जगवण्यासाठी शेतकरी टँकंरने पाणी टाकत आहेत उत्पन्न आले नाही आले तरी चालेल परतु माझी बाग जगायला हवी यासाठी प्रयत्न करत असतांनाच अवकाळी पाऊस आणी वादळाने या पिकांचे नुकसान झाले आहे. जामदा डावा कालवा लगत आंब्याचा बहार चांगला आला होता मात्र आंबा आणि लिंबू, केळी पिकांचा तोडांशी आलेला घास अवकाळीने हिरावुन नेला आहे.अमळनेरात द्विशाताब्दी महोत्सवाचा मंडप जमीनदोस्तअमळनेर येथील संत सखाराम महाराज वाडी संस्थानतर्फे २१ ते २९ एप्रिल दरम्यान साजरा होणाºया द्विशताब्दी महोत्सवा निमित्त बोरी नदी वाळवंटात पारायण मंडप, महायज्ञ कुंड, भक्त निवास आणि इतर सुविधा उभारण्यात आल्या होत्या, मात्र रविवारी रात्री नऊ च्या सुमारास आलेल्या वादळात यज्ञ मंडप कोसळला आहे तर इतर सुविधा कक्षांचे पडदे देखील सोसाट्याच्या वाºयामुळे फाटले आहेत. यामुळे पाच दिवसावर येऊन ठेपलेल्या द्विशताब्दी महोत्सव कसा साजरा होणार याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान वाडी संस्थान चे गादीपती संत प्रसाद महाराज परगावी गेले होते मात्र सायंकाळी ते परत आले. यावेळी त्यांनी सांगितले की, महोत्सवाच्या तारखेपर्यंत युद्धपातळीवर काम करण्यात येवून पुन्हा हवा तसाच मंडप उभारला जाईल.सद्गुरु संत सखाराम महाराज यांच्या समाधीस १८१८ ते २०१८ असे दोनशे वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन वाडी संस्थान तर्फे करण्यात आले आहे. या दरम्यान येथे विराट संत संमेलन देखील होणार आहे. तसेच अमळनेर साईगजानन नगरात विद्युत खांब व तार तुटली. रात्रभर अंधार होता.पाचोरा तालुक्यातील मोहाडी येथेवीज कोसळून चारा खाकगुरांसाठी रचून ठेवलेल्या चाºयाच्या गंजीवर वीज कोसळून चारागंजी बेचिराख झाल्याची घटना पाचोरा तालुक्यातील मोहाडी येथे घडली. १४ रोजी रात्री ९ चे सुमारास पाचोरा तालुक्यात अचानक विजांच्या कडकडाटासह वादळ सुटले व कोसळून मोहाडी येथील रना हरी पवार यांच्या शेतातील ५० हजाराचा चारा खाक झाला. यामुळे रना पवारांच्या गुरांवर उपासमारीची पाळी आली.ह्या वादळामुळे शहरातील बकाल वस्तीत रहाणारे व पाल टाकून कुटुंब रहात असलेले वादळामुळे उघड्यावर आले .आंब्याचे मोहोर गळून पडले .