आॅनलाईन लोकमतचोपडा, दि.४ : येथील बसस्थानकावर बसमध्ये चढतांना प्रवाशाच्या खिशातून तीन लाख रुपये काढून चोरटा पसार झाल्याची घटना रविवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रानुसार, ४ रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास चोपडा बसस्थानकावर यावल - धुळे बस (क्रमांक एम. एच. १४, बी टी २११९) मध्ये चढणारे कैलास वामन साबळे रा. डाबियाखेडा ता. नेपानगर जि. बºहाणपूर यांच्या खिशातून अज्ञात आरोपीने २००० हजाराच्या १५० नोटा असलेली प्लास्टिक पिशवी काढून पोबारा केला. साबळे हे शिरपूर बायपासजवळ पोहचल्यावर त्यांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी बसमध्ये शोधले असता पैसे मिळून न आल्याने ते तेथेच उतरून बसस्थानकावर आले. त्यांनी तेथील पोलिसांच्या मदतीने सीसीटीव्हीत पाहिले असता त्यात एक पांढरा शर्ट , काळी पॅन्ट परिधान केलेला व डोक्यात टोपी घातलेला ४० ते ४५ वर्षाच्या इसमाने पैसे चोरले असल्याचे आढळले. याबाबत कैलास वामन साबळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार दत्तात्रय पाटील हे करीत आहेत.लग्नासाठी दागिने घेण्याच्या पैशावर चोरट्याने मारला डल्लाकैलास साबळे हे बºहाणपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागात लिपीक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मुलीचे पुढच्या महिन्यात लग्न आहे. सोमवार ५ रोजी बस्ता होता. त्या अगोदर धुळे येथील त्यांचे शालक यांच्यासोबत ते धुळे येथून लग्नाच्या दागिन्यांची खरेदी करणार होते. म्हणून कैलास साबळे यांनी बºहाणपूर स्टेट बँकेतून आपल्या बचत खात्यातून चार लाख रुपये २ रोजी काढले होते.त्यातील तीन लाख रुपये घेऊन ते दागिने घेण्यासाठी धुळे येथे शालकाकडे निघाले होते. सकाळी बºहाणपूर- सुरत या गुजरात डेपोच्या बसमधून त्यांनी बºहाणपूर- चोपडा असा प्रवास केला. पुढील बस शिरपूर मार्गे असल्याने ते चोपडा येथे उतरले. त्यांना भूक लागली असल्याने बसस्थानकासमोरील हॉटेलवर नाष्टा केला. नंतर साडेबारा वाजेच्या सुमारास यावल धुळे बसमध्ये चढले नेमके त्या बसमध्ये चढताना चोरट्याने आपला डाव साधला.
चोपड्यात बसमध्ये प्रवाशाच्या खिशातून तीन लाख रुपये लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 11:29 PM
चोपडा येथील बसस्थानकावर उभ्या असलेल्या यावल- धुळे बसमध्ये चढणाºया प्रवाशाच्या खिशातून तब्बल तीन लाख रुपये लांबविण्याची घटना रविवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. बसस्थानकातील सीसीटीव्हीत संशयीत कैद झाला आहे.
ठळक मुद्देअज्ञात चोरट्याविरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला अज्ञात आरोपीने २००० हजाराच्या १५० नोटा असलेली प्लास्टिक पिशवी काढून पोबारा केला