चोपडा : येथील रोटरी क्लब ऑफ चोपडा या सेवाभावी संस्थेतर्फे कोकणातील पूरग्रस्त बांधवांसाठी तातडीची मदत म्हणून २० शेल्टर किट रविवारी रवाना करण्यात आले आहेत.
कोकणातील भयावह पूर परिस्थिती लक्षात घेता येथील अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झालेली आहेत.
या नैसर्गिक संकटात शासनातर्फे मदतीचा ओघ सुरूच आहे. मात्र, नैसर्गिक आपत्तीच्या काळात पूरग्रस्तांना तातडीची मदत पोहोचावी, या हेतूने रोटरी क्लब ऑफ चोपडा या संस्थेतर्फे अत्यावश्यक अन्नधान्य घटकांचे एकूण २० शेल्टर किट तयार करून रवाना करण्यात आले आहेत.
यावेळी रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष पंकज बोरोले, मानद सचिव प्रवीण मिस्त्री, प्रकल्पप्रमुख नितीन जैन, सहप्रकल्पप्रमुख धीरज अग्रवाल, खजिनदार भालचंद्र पवार, प्रफुल्ल गुजराथी, एम. डब्ल्यू. पाटील, व्ही. एस. पाटील, विलास पी. पाटील, पी. बी. पाटील, चेतन टाटिया, अर्पित अग्रवाल, विजय पाटील, रमेश वाघजाळे, पृथ्वीराज राजपूत, एस. बी. पाटील आदी उपस्थित होते.