ऑनलाईन लोकमतचोपडा, जि. जळगाव, दि. 3 - तालुक्यातील वर्डी फाटय़ाजवळ अंकलेश्वर ब:हाणपूर महामार्गावर एक तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आल. यात एक ते दीड हजार शेतक:यांचा सहभाग होता. मागण्यांचे निवेदन तहसीलदार दीपक गिरासे यांना देण्यात आले. तर वर्डी फाटय़ाजवळ केळी, भाजीपाला इतर पिके आणून त्यांची होळी करण्यात आली. तासभर या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती. नंतर वाहतूक सुरळीत झाली. या आंदोलनात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, लहूश धनगर, तुषार पाटील, विजय पाटील, अतुल ठाकरे, संजीव सोनवणे यांच्यासह पंचक्रोशीतील शेतकरी सहभागी होते.चोपडा अमळनेर रस्त्यावर धरणगाव नाक्याजवळदेखील शेतकरी कृती समिती तर्फे तासभर रास्तोरोको करण्यात आले. रास्तारोको झाल्यानंतर जमलेल्या सर्व शेतक:यांनी सरकारचा धिक्कार करीत घोषणा दिल्या व शिवाजी चौकापयर्ंत मोर्चा काढण्यात आला.
चोपडय़ात शेतक:यांचा रास्ता रोको
By admin | Published: June 03, 2017 6:27 PM