चोपडा,दि.11- उन्हाळ्यात सर्वत्र पाण्याची टंचाई भासत आहे. थेंब थेंब पाणी वाचविण्यास प्राधान्य दिले जात आहे. मात्र चोपडय़ात र}ावतीवरील पुलाच्या समांतर असलेल्या जलवाहिनीच्या व्हॉल्वमधून हजारो लिटर्स पाण्याची नासाडी होत आहे. याकडे पालिकेचे दुर्लक्ष झालेले आहे.
येथील जलशुद्धीकरण केंद्राकडून शहरातील आझाद चौक आणि मध्यवर्ती भागात पिण्याचे पाणी घेऊन जाणारी मुख्य पाईपलाईन आहे. 11 रोजी सकाळी तपस्वी मारोती चौकात र}ावती नदीवरील पुलाच्या कोप:याजवळ पुलास समांतर असलेल्या पाण्याची मुख्य वाहिनीच्या व्हॉल्व गळतीतुन हजारो लिटर पाणी वाया जात होते.
ऐन उन्हाळ्यात चोपडा शहरात चार दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. मल्हारपुरा भागात न्हावीवाडय़ात पाणी चढत नाही.दुसरीकडे मात्र हजारो लिटर पाणी वाया जात असते. पालिकेतील पाणी पुरवठा प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यानेच असे हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
याबाबत पालिकेतील पाणी पुरवठा अभियंता एस. आर. वाघ यांचेशी संपर्क केला असता ते म्हणाले की,सदर पाईप लाईन वॉश आउट करण्यासाठी व्हॉल्व मोकळा करावा लागतो, असे पाणी पुरवठा अभियंता एस.आर.वाघ यांनी सांगितले.