भुसावळ, जि.जळगाव : ख्रिश्चन बांधवांचा पवित्र सण येशू ख्रिस्त यांच्या जन्मानिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या ख्रिसमस अर्थात नाताळसाठी समाजबांधवांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. विविध कार्यक्रमांनी ख्रिसमस हा सण साजरा केला जाणार आहे.ख्रिसमसनिमित्त नवीन कपडे, घराला रंगरंगोटी करण्यात येत आहे. कामानिमित्त बाहेरगावाला गेलेले समाजबांधव सण साजरा करण्यासाठी शहरात दाखल झाले आहेत. शहरातील सर्वच चर्चमध्ये समाजबांधवांची रेलचेल वाढली आहे. संपूर्ण आठवडाभर समाजबांधव विविध कार्यक्रमाने हा सण साजरा करत असतात.येथील सन १८७४ मध्ये बांधली गेलेली सिक्रेट हार्ट चर्चचे फादर जो डेनिस हे गेल्या तीन वर्षापासून चर्चची धुरा सांभाळत आहेत. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला क्रिसमस ट्री बनवून उत्सव साजरा करण्यात येतो. तसेच २५ रोजी समाज बांधवांना मिठाई वाटप करून प्रेमाचे संदेश पाठविण्यात येतात.ख्रिसमसनिमित्त १९ ते २३ दरम्यान ठिकठिकाणी कॅरोल सिंगिंग, २४ ला चर्च स्वच्छता व डेकोरेशन तसेच ख्रिस्त जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला विशेष उपासना, २५ ख्रिस्त जन्मोत्सव विशेष उपासना प्रेमचंद एस.जाधव हे समिती असून, संदेश पास्टर स्वप्नील नाशिककर हे देणार आहे. २६ ला विविध स्पर्धा, २७ ला संडेस्कूल कार्यक्रम, २८ ला चित्रकला स्पर्धा, २९ ला चार्ज पिकनिक, ३० ला प्रभूवार उपकार स्तुती उपासना, ३१ ला भजन वॉच नाईट सर्र्व्हीस, १ जानेवारीला नवीन वर्ष विशेष उपासना व प्रभू भोजन विधी होणार आहे. या सर्व कार्यक्रमांसाठी समिती तसेच विभाग संदेश वेळेनुसार निश्चित करण्यात आलेले आहे.
भुसावळ शहरात ख्रिसमसची जोरदार तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 10:49 PM
ख्रिश्चन बांधवांचा पवित्र सण येशू ख्रिस्त यांच्या जन्मानिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या ख्रिसमस अर्थात नाताळसाठी समाजबांधवांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
ठळक मुद्देविविध चर्चमध्ये होणार कार्यक्रमकामानिमित्त बाहेरगावी गेलेले समाजबांधव सण साजरा करण्यासाठी शहरात दाखल१ जानेवारीला नवीन वर्ष विशेष उपासना व प्रभू भोज