जळगाव : जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या महिलेला वाईट हेतूने स्पर्श करणा:या तरुणाला महिलेच्या नातेवाईकासह अन्य जणांनी चोपल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता बाह्यरुग्ण कक्षातील 116 क्रमांकाच्या डॉक्टरांच्या दालनात घडली. ही घटना घडली तेव्हा डॉक्टर दालनात उपस्थित नव्हते. महिलेला स्पर्श करणारा तरुण हा चहा विक्री करतो.जामनेर तालुक्यातील एक महिला तिचा पती व दिर यांच्यासोबत गुरुवारी दुपारी जिल्हा रुग्णालयात मानेच्या तपासणीसाठी आली होती. मात्र रुग्णालयात वॉर्ड क्रमांक 1 शिवाय कुठेच डॉक्टर नव्हते व जे होते ते देखील रुग्णांची तपासणी करीत नव्हते, त्यामुळे ही महिला 116 क्रमांकाच्या दालनात गेली. तेथे डॉक्टरांची प्रतिक्षा करीत असताना रुग्णालयात चहा विक्री करणारा तरुणही त्याच दालनात आला. तो देखील मानेच्या तपासणीसाठीच आला होता. या महिलेला त्याने आजाराविषयी विचारणा केली व मानेचे कारण सांगितल्यानंतर त्या तरुणाने तेथे स्पर्श केला. त्याच वेळी महिलेचा पती तिथे आला असता हा प्रकार पाहून त्याने तरुणाला मारहाण करायला सुरुवात केली. महिलेच्या मते त्याने वाईट हेतूने हा स्पर्श केला. तर तरुणाच्या मते त्या महिलेनेच स्वत:च्या हाताने गळ्याला हात लावण्यास सांगितले.पोलिसांनी घेतले ताब्यातडॉक्टरांच्या दालनातच तरुणाला चोपले जात असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती. डय़ुटीला असलेल्या पोलिसाने त्याला मारहाणकत्र्याच्या तावडीतून सोडवून चौकीत आणले. त्यानंतर हा तरुण व ती महिला या दोघांनाही पोलीस स्टेशनला नेण्यात आले. उपनिरीक्षक गजानन राठोड यांनी दोघांची चौकशी केली. मात्र दोघांनीही तक्रार न देण्याचा निर्णय घेतल्याने कोणावरही कारवाई झाली नाही.दिवसभर डॉक्टर गायब; रुग्णांचे हालजिल्हा रुग्णालयात गुरुवारी दिवसभर डॉक्टर गायब झाले होते. त्यामुळे अनेक रुग्णांना दिवसभर त्यांची प्रतिक्षा करावी लागली. लक्ष्मण हिरामण गवळी (वय 60 रा,भुसावळ) व हरी मोहन सौनी (रा.किनोद) या दोन रुग्णांना तर अक्षरश: रडू कोसळले. वॉर्ड क्रमांक 1 मध्ये असलेले डॉ.कुरकुरे यांनीही रुग्णांची तपासणी करण्यास नकार दिला. संध्याकाळी 116 मध्ये डॉ.सुशांत सुपे दाखल झाले. 4 महिन्यापासून सीएमओ म्हणून डय़ुटी लावली जात आहे, त्यामुळे सुटीही मिळत नसल्याने दिवसभर वेळ देणे शक्य नसल्याचे डॉ.सुपे यांनी सांगितले.
जिल्हा रुग्णालयात तरुणाला चोप
By admin | Published: February 10, 2017 12:52 AM