आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.१६ - गेल्या आठवडाभरापासून वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याच्या प्रकारामुळे निवृत्ती नगरासह रायसोनी नगरातील रहिवाशी त्रस्त झाले आहेत़ अनेक वेळा तक्रार करून सुध्दा फक्त उडवा-उडवीची उत्तरे मिळत असल्यामुळे रहिवाश्यांकडून महावितरणाबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़मान्सूनपूर्वची कामे सुरू आहेत़ त्यामुळे तीन ते चार तास वीज पुरवठा खंडीत केला जातो़ त्यात अचानक खंडित झालेल्या वीज पुरवठ्याची भर पडते. गेल्या आठवडाभरापासून निवृत्ती नगरात सकाळी नऊ वाजता वीज गुल झाल्यावर ती दुपारी सुरळीत होते़ त्यानंतर रात्री वारंवार वीज पुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे़ रायसोनी नगरात देखील हाच प्रकार सुरू आहे़ दरम्यान, या ठिकाणी रात्री ११ ते १ वाजेपर्यंत वीज गुल होत आहे़ याबाबत रहिवाश्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करून सुध्दा तीच परिस्थिती अजूनही असल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे़यावर्षी भारनियमनाचा त्रास नसला तरी अचानक वीज पुरवठा वारंवार खंडित होत असतो. गेल्या महिनाभरात अनेक भागातील संतप्त नागरिकांनी सबस्टेशनवर मोर्चा देखील काढला़ तरी महावितरण अधिकाºयांना जाग येत नसल्याचे चित्र यातून स्पष्ट होते़ सध्या महावितरणतर्फे तारांना अडणाºया फांद्यांची छाटणी, रोहित्रातील आॅइल तपासणी, लोंबकळणाºया तारा ओढणे, वाकलेले पोल सरळ करणे यासारखी कामे केली जात आहेत. त्यामुळे देखील तीन ते चार तास वीज पुरवठा खंडीत होतो़ वीज नसल्यामुळे नागरिकांना उकाड्यात बसावे लागते़ त्यामुळे दुरूस्तीची कामे सकाळी करण्यात यावी अशी मागणी होत आहे़
जळगावात विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 4:46 PM
निवृत्ती नगरासह रायसोनी नगरात रोज चार तास वीज गायब
ठळक मुद्देवारंवार वीज पुरवठा खंडितमान्सूनपूर्व कामांमुळे रोज तीन ते चार तास वीज पुरवठा खंडीतमहावितरणच्या कामकाजाबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी