जामनेर : शेंगोळे ता.जामनेर येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून नागरिकांना १० ते १५ दिवसाआड पाणी मिळत आहे. गावाला मोयगाव धरणातून पाणी पुरवठा घेत असला तरी या धरणात अत्यल्प पाणीसाठी असल्याने प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहेसुमारे दीड हजार लोकसंख्या असलेल्या या गावात गेल्या एक महिन्यापासून टंचाई आहे. चार किमी अंतरावरील मोथगाव धरणातून सध्या पाणी पुरवठा घेत आहे. धरणात अत्यल्प पाणीसाठा असल्याने ग्रामस्थांना पाणी उशीराने दिले जात आहे. गावाजवळ असलेल्या पाणीसाठ्यावर महिला धुनी, भांडी करतात व पिण्यासाठी विहिरीतून पाणी घेतात.मोयगाव धरणातील पाणी संपण्याच्या स्थितीत असल्याने ग्रामस्थांना भविष्यातील भीषण टंचाईची चिंता लागून आहे. गेल्या दोन महिन्यापासून सरपंच व सदस्यांमध्ये वाद निर्माण झाला असून उपसरपंचासह आठ सदस्यांनी राजीनामे दिल्याने पदाधिकाऱ्यांकडून गावाच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरीक करीत आहे.पंचायत समितीने टंचाई स्थिती लक्षात घेवून तातडीने उपाय योजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून घेत आहे.
जलसंपदा मंत्र्यांच्या मतदार संघातील शेंगोळे गावातील नागरिक पाणी टंचाईने त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 11:10 PM
जामनेर : शेंगोळे ता.जामनेर येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून नागरिकांना १० ते १५ दिवसाआड पाणी मिळत आहे. ...
ठळक मुद्दे१० ते १५ दिवसाआड होतोय पाणी पुरवठामोयगाव धरणातील पाणीसाठा अत्यल्पपर्यायी व्यवस्था करण्याची नागरिकांची मागणी