जळगाव : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापनदिन समारंभानिमित्ताने जिल्हास्तरीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम जळगावजिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आज (15 आॅगस्ट) रोजी सकाळी 9.05 वाजता राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. हा समारंभ जास्तीत जास्त नागरीकांना कुटूंबासमवेत घरी बसून बघता यावा. याकरीता जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने या कार्यक्रमाचे फेसबुक लाईव्ह करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.कोरोना विषाणूचा जिल्ह्यात वाढता प्रसार लक्षात घेता नागरीकांची गर्दी होवू नये. तसेच ज्येष्ठ नागरीकांना हा समारंभ घरबसल्या बघता यावा. याकरीता प्रशासनाच्यावतीने या लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि. 15 आॅगस्ट, 2020 रोजी सकाळी 8:55 वाजेपासून या फेसबुक पेजवरून लाईव्ह करण्यात येणार आहे. त्
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातील ध्वजारोहणाचा कार्यक्रम नागरिकांना पाहता येणार घरबसल्या...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 8:12 PM