भुसावळ : पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना हटवावे, सर्वसाधारण सभा रद्द करावी यासह विविध मागण्यांसाठी जनआधार विकास पार्टीतर्फे जोरदार घोषणाबाजी करीत यावल रोडवरील महात्मा गांधी पुतळ्यापासून सोमवारी सकाळी ११ वाजता पायी मोर्चा काढण्यात आला़ प्रांताधिकारी कार्यालयासमोर मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत ठिय्या मांडला़ मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना देण्यात आले़दरम्यान, मोर्चेकऱ्यांनी वाढलेली घरपट्टी रद्द करावी तसेच नगरसेवकांविरुद्ध दाखल असलेले खोटे गुन्हे मागे घ्यावे या आशयाचे फलक दर्शवून लक्ष वेधले़ मोर्चेकऱ्यांनी काही वेळ मांडलेल्या ठिय्या आंदोलनामुळे यावल रोडवरील वाहतूक विस्कळीत झाली़ शहर पोलिसांतर्फे चोख बंदोबस्त राखण्यात आला़ मोर्चा प्रसंगी सचिन चौधरी, माजी नगरसेवक जगन सोनवणे, नगरसेविका पुष्पा सोनवणे, प्रदीप देशमुख, एस़पी़देशमुख, सिकंदर खान, खान शब्बानाबी, दुर्गेश ठाकूर, पुष्पा चौधरी, हरीष बोरसे, राहुल बोरसे, लता पाटील यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती़मुख्याधिकारी यांना निलंबित करण्याची मागणीजनआधार विकास पार्टीतर्फे विविध मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना देण्यात आले़ निवेदनाचा आशय असा की, पालिकेची २७ रोजी झालेली सर्वसाधारण सभा रद्द करावी, १० टक्के ऐवजी तीन पटीने होत असलेली करवसुली सक्तीने थांबवावी, सत्ताधाऱ्यांनी ९० दिवसात दिलेले मूलभूत सुविधांची आश्वासन फोल ठरल्याने नगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा, बेजबाबदार मुख्याधिकाऱ्यांना निलंबित करावे, जनआधार विकास पार्टीच्या तीनही नगरसेवकांविरुद्ध दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत, २७ रोजीच्या सभेत घेण्यात आलेले विषय न्यायप्रविष्ट असल्याने मुख्याधिकाऱ्यांनी न्यायालयाची अवमानना केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा यासह विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले़ मुख्याधिकाऱ्यांना हवे संरक्षण, भाजपाचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन४भारतीय जनता पार्टी व अपक्ष आघाडीतर्फे सोमवारी दुपारी प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना निवेदन देण्यात आले़ जनआधार विकास पार्टीच्या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत मुख्याधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली होती़ याप्रकरणी संबंधितांविरोधात पोलिसात गुन्हादेखील दाखल केला आहे़ कर्तव्यदक्ष मुख्याधिकाऱ्यांवर काही राजकीय व्यक्ती, त्यांचे समर्थक व त्यांचे कार्यकर्ते हल्ला करण्याची शक्यता आहे़ त्यामुळे बाविस्कर यांना संरक्षण देण्याची मागणी शिष्टमंडळाने प्रांतांना केली़ ४सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांवर अॅट्रासिटी, लूटमार, छेडछाड यासारखे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देण्यात येत आहे़ हे गुन्हे न्यायालयाच्या माध्यमातून दाखल करण्याची शक्यताही नाकारता येत नाही़ मुख्याधिकारी नियमानुसार काम करीत आहेत मात्र बेकायदेशीर कामांना नोटीस देणे, त्यास विरोध करणे, बेकायदेशीर ठरावांना विरोध करणे, न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणे असे प्रकार शहरात सुरू आहेत़४निवेदनावर नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, गटनेता मुन्ना तेली, प्रमोद नेमाडे, रमेश नागराणी, महेंद्रसिंग ठाकूर, प्रीतमा महाजन, सोनल महाजन, पुष्पाबाई बत्रा, प्रतिभा पाटील, मंगला आवटे, बोधराज चौधरी, सुषमा पाटील, अनिता सोनवणे, मुकेश पाटील, किरण कोलते, शोभा नेमाडे, राजेंद्र नाटकर, शैलजा नारखेडे, निर्मलकुमार कोठारी, लक्ष्मी मकासरे, अमोल इंगळे, रवींद्र खरात, प्रा़सुनील नेवे, दीपाली बऱ्हाटे यांच्या सह्या आहेत़
जनआधार संघटनेच्या मोर्चाने दणाणले शहर
By admin | Published: April 03, 2017 10:55 PM