लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात केंद्राच्या इइएसएलच्या माध्यमातून एस्को तत्वावर एलईही पथदिवे बसविण्याच्या कामाचा मंगळवारी शुभारंभ झाला.
शहरात नव्याने १९ हजार ४५७ एलईडी पथदिवे बसविण्यात येणार आहेत. याकामाला डिसेंबर २०१८ मध्येच सुरुवात झाली होती. मात्र, मक्तेदाराच्या कामाबाबत तक्रारी वाढल्यामुळे हे काम थांबविण्यात आले होते. पुन्हा या कंपनीला मनपाने संधी दिली असून, या एलईडी योजनेमुळे दरवर्षी ३२.६ लाख युनिट वीजेची बचत
होणार असून मनपाचा १ कोटी ९५ लाख रूपयांचा खर्च टळणार आहे.
मोहाडी रस्त्यापासून एलईडी बसविण्याचा कामाला सुरुवात झाली असून, तीन महिन्यात शहरातील सर्व प्रभागात एलईडी बसविण्यात येणार आहे. हा करार सात वर्षांसाठी असून, देखभाल दुरुस्तीचे काम देखील मक्तेदारावर सोपविण्यात आले आहे. यासह मनपातील विद्युत विभागातील सुमारे ४० हून अधिक कर्मचाऱ्यांचा वापर मनपाला इतर आस्थापनांवर करता येणार आहे.
-मक्तेदार ईईएसएल प्रा.लि.
-७ कोटींचा मक्ता
- पोलची उंची, रुंदी पाहून १८,३५,७० व ११० व्हॅटचे एलईडी बसविण्यात येतील
- यासाठी काही भागात नव्याने पोल देखील उभारण्यात येतील
- ७ वर्षांसाठी करण्यात आला आहे करार
काय पडणार फरक
- सध्याच्या पथदिव्यांनुसार एकुण भार १३११ केडब्लू - एलईडी पथदिवे बसविल्यानंतर मात्र हा लोड ५६७ केडब्लू पर्यंत कमी होईल
- सध्या ५७.४ लाख युनिट वीजेचा होतोय वापर - एलईडीमुळे ३२.६ लाख युनिट वीजेची होणार बचत
- पथदिव्यांचा वीजबीलावर होणारा खर्च ३.४४ कोटी - एलईडी पथदिवे केवळ १.४८ कोटी रूपये खर्च होणार आहे
- दिवाबत्ती दुरूस्ती कामाचा एकुण सात वर्षाचा खर्च ३१.२७ कोटी होता - एलईडी बसविल्यानंतर सात वर्षाचा खर्च १२.१४ कोटी होणार