जळगाव : दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरुन दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी साडे अकरा वाजता भिलपुरा पोलीस चौकीजवळील मनपा शाळा क्रमांक 28 नजीक घडली. प्रकरण शनिपेठ पोलीस स्टेशनला गेल्यावर तेथेही पुन्हा वाद उफाळून आला. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.याप्रकरणी पोलिसांनीच सरकारतर्फे फिर्यादी होवून सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मनपा अतिक्रमण निमरूलन विभागाची गाडी येत असल्याचे दिसल्याने मनोज प्रकाश कोळी (वय 30,रा.कांचननगर)हा टोमॅटो विक्रेता त्याची हातगाडी बोळमध्ये नेत असताना मनोज गवळी याच्या दुचाकीला त्याचा धक्का लागला. या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. मनोज कोळी यांना मारहाण झाल्याची घटना कळाल्यावर काही जणांनी धाव घेतली. तसेच गवळी गटाकडूनही जमाव घटनास्थळी चाल करुन आला. दोन्ही गट एकमेकांवर धावून आले. यात कोळी किरकोळ जखमी झाला असून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सहा जणांना घेतले ताब्यातपोलिसांसमोर हाणामारी करुन कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रय} केला म्हणून दोन्ही गटाच्या सहा जणांविरुध्द कलम 160 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.त्यात बंटी बालन्ना गवळी (वय 35 ), बाळू सुरेश गवळी (वय 34) व राजू पापन्ना गवळी (वय 27 ) सर्व रा.शनी पेठ तर दुस:या गटाचे मनोज प्रकाश कोळी (वय 30), रवींद्र नवल सपकाळे (वय 20) व किशोर रामदास कोळी (वय 22) सर्व रा.कांचननगर, जळगाव यांचा समावेश आहे. या सर्वाना अटक करण्यात आली.
पोलीस चौकीसमोरच हाणामारी
By admin | Published: February 08, 2017 1:07 AM